शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

संतप्त मच्छीमारांची थेट धडक, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 5:03 PM

पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपोषणस्थळी भेट न घेतल्याने संतप्त मच्छीमार आणि मिऱ्यावासीयांनी थेट येथील शासकीय विश्रामगृहावर धडक देत संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा निषेध करीत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देसंतप्त मच्छीमारांची थेट धडकपालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

रत्नागिरी : पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपोषणस्थळी भेट न घेतल्याने संतप्त मच्छीमार आणि मिऱ्यावासीयांनी थेट येथील शासकीय विश्रामगृहावर धडक देत संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा निषेध करीत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर पालकमंत्री वायकर यांनी मिऱ्यावासीयांच्या शिष्टमंडळाची भेट घेत लवकरच आपले सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलनकर्ते शांत झाले.

रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या येथील मच्छीमारांनी बंधाऱ्याच्या मागणीसाठी तसेच एलईडी दिव्याने मासेमारी करणाऱ्यांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. त्यांचा हा लढा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे.त्याचबरोबर मिऱ्यांवासीयांचे अस्तित्व समुद्राच्या अतिक्रमणामुळे धोक्यात आले आहे. मिऱ्या समुद्रकिनारी बंधारा बांधावा, यासाठी अनेकदा शासनाकडे मागणी करुनही ती अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मिऱ्यावासीय संतप्त झाले असून, अनेकदा निवेदनांद्वारे मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मिऱ्यांवासीयांनी प्रजासत्ताक दिनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला.पालकमंत्री वायकर आणि जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जयस्तंभ येथे आंदोलनकर्त्यांना भेट न दिल्याने मिऱ्यावासीय व मच्छीमार संतप्त झाले. त्यानंतर हजारोंच्या संख्येने मच्छीमार व मिऱ्यावासीय यांनी थेट शहरातील शासकीय विश्रामगृहावर धडक दिली. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची गाडीही अडवली होती. अखेर पालकमंत्र्यांनी मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला भेट दिली. पालकमत्र्यांनी एलईडीने सुरु असलेल्या मासेमारीवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRavindra Vaikarरवींद्र वायकरRatnagiriरत्नागिरी