शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कृ षिपंपाच्या जोडण्या रखडल्या

By admin | Updated: August 24, 2015 23:26 IST

ऊर्जामंत्र्यांकडून अपेक्षा : महावितरणच्या समस्या प्रलंबित

रत्नागिरी : महावितरणकडून ठेकेदार उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात गेली चार वर्षे कृषिपंपाच्या जोडण्या रखडल्या असून, आजच्या घडीला ११०० शेतकरी कृषिपंपांची प्रतीक्षा करीत आहेत. निविदा वेळेत काढली जात नसल्याने ही समस्या ओढवली आहे. महावितरणकडून यावर्षी जिल्ह्यात ३५ सौर कृषिपंप वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांचा प्रश्न मात्र ‘जैसे थे’ आहे. रत्नागिरीत येणारे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे. महावितरण कंपनीकडून ‘कनिष्ठ यंत्रचालक’ व ‘कनिष्ठ तंत्रज्ञ’ पदासाठी २००९ मध्ये सरळसेवा भरतीमध्ये घोटाळा करून चक्क शैक्षणिक अर्हता डावलून पदभरती करण्यात आली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून कागदपत्रे तपासणी करण्यात आली. त्यानुसार शैक्षणिक अर्हता बसत नाही म्हणून सलग तीन वर्षे सेवा झालेल्या उमेदवारांची सेवा खंडित केली. नियुक्ती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी सेवा खंडित झालेल्या उमेदवारास मात्र कोकण परिमंडलामध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ पदावर रुजू करून घेण्यासाठी मुख्य कार्यालयाकडून दबाव आणण्याचा अजब प्रकार सुरू आहे. महावितरण कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता कोकणासाठी विशेष कर्मचारी वर्गनियुक्ती करणे गरजेचे आहे. तसेच अनेक रिकाम्या जागांवरती कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्ती केली जाते. मात्र, त्यांचे वेतन सहा महिन्यांपेक्षा अधिक थकीत राहात असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. कोकणातील हवामान दमट असल्यामुळे वाहिन्या तसेच अन्य उपकरणांना गंज येण्याचे प्रकार अधिक आहे. त्यामुळे कोकणाकरिता देखभाल दुरुस्ती साहित्य वेळेवर व अधिकचे मिळणे गरजेचे आहे; परंतु ते तुटपुंजे मिळत असल्यामुळे तांत्रिक कर्मचाऱ्यांना उपलब्ध साहित्यामध्ये काम करणे अवघड होत आहे. त्याकरिता भूमिगत वीज वाहिन्यांवर अधिक भर देणे आवश्यक आहे. २००९ साली रत्नागिरी विभागाचे विभाजन करून लांजा विभाग करण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. चिपळूण विभागाचे विभाजन करून खेड विभाग करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यावेळी चिपळूण विभागाचे विभाजन होऊन खेड विभाग नवीन निर्माण केला गेला; परंतु रत्नागिरी विभागाचे विभाजन मात्र अद्याप रखडले आहे. या संबंधी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आले असून, याबाबत विचार होणे गरजेचे आहे. ऊर्जामंत्र्यांकडून अपेक्षा कृषिपंपांच्या जोडण्या त्वरित मिळणे गरजेचे बराच काळ रिक्त राहिलेली पदे भरणे दुरुस्तीसाठी तुटपुंजे साहित्य भरतीमधील गैरव्यवहार नव्या विभागांची निर्मिती