शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठ रूग्णालय कर्मचाऱ्यांची उपासमार

By admin | Updated: January 6, 2015 00:45 IST

प्रजासत्ताक दिनी उपोषण : शासनाचे उंबरठे झिजवूनही ५ ते १९ महिन्यांचे वेतन रखडले

रत्नागिरी : तीन वर्षे उलटून गेली तरीही येथील कुष्ठ रूग्णालयाच्या पाच कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाने न दिल्यामुळे या कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे. याबाबत सातत्याने शासनाचे उंबरठे झिजवूनही मागील ५ ते १९ महिन्यांचे वेतन रखडल्याने आता या कर्मचाऱ्यांनी येत्या प्रजासत्ताक दिनी बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.सर दि. मा. पेटिट यांनी कुष्ठरूग्णांना निवारा मिळवून देण्यासाठी रत्नागिरीत रूग्णालय उभारले. यात अनेक रूग्ण उपचार घेत असतानाच काही सेवाभावी संस्थांच्या मानवतावादामुळे तसेच आर्थिक मदतीमुळे येथे आपले जीवन व्यतित करीत होते. मात्र, महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे निमुर्लन झाल्याचा दावा करीत महाराष्ट्रातील उस्मानाबाद, कोल्हापूरसह रत्नागिरीचे कुष्ठ रूग्णालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे येथील रूग्णालयातील दीपक नागवेकर (कुष्ठरोग तंत्रज्ञ), अविनाश रांगणकर (कनिष्ठ सहाय्यक), सुधाकर रसाळ (स्वयंपाकी), वनिता पवार, ताराबाई राठोड (दोघीही सफाई कामगार) यांना अतिरिक्त ठरविण्यात आले. या सर्वांचे मार्च २०११ पर्यंतचे वेतन व भत्ते देण्यात आले. त्यानंतर मात्र या रूग्णालयाचे अनुदान बंद करण्यात आले.येथील रूग्णांनी शासनाच्या म्हणण्यानुसार इतरत्र जाण्यास नकार दिला. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मंडळी या रूग्णालयातील कुष्ठ रूग्णांना सेवा देत राहिली. परंतु त्यांची दखल ना आरोग्य विभागाने घेतली ना लोकप्रतिनिधीनी. यापैकी स्वयंपाकी सुधाकर रसाळ यांचे जानेवारी २०१२ ते जुलै २०१३ (१९ महिने) या कालावधीतील, तर अनिवाश रांगणकर यांचे जानेवारी २०१२ ते मे २०१३ (१७ महिने) आणि उर्वरित तिघांचे जानेवारी ते मे २०१२ या पाच महिन्यांचे वेतन रखडले आहे. याबाबत तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारात तसेच शासनाकडे वारंवार निवेदन देऊनही या कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकली गेली नाही.अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी धरणाधिकार वापरून या पाचही कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना जिल्ह्यात अन्यत्र केल्या. मात्र, यापैकी वनिता पवार, दीपक नागवेकर हे सेवानिवृत्त झाले. उर्वरितांनी सेवानिवृत्तीला काही वर्षे शिल्लक असताना सेवानिवृत्ती घेतली. मात्र, अजूनही त्यांचे मागील वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. (प्रतिनिधी)कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले दीपक नागवेकर यांची पत्नी सध्या कॅन्सरने त्रस्त आहे. त्यामुळे तिच्या उपचारासाठी नागवेकर यांना पैशांची नितांत गरज आहे. याबाबत त्यांनी वैयक्तिक स्तरावरही सर्वत्र निवेदन दिली. मात्र, त्याची अद्याप कुठलीच दखल घेतलेली नाही. याचा निषेध म्हणून प्रजासत्ताकदिनी उपोषण करण्यात येणार आहे. दीपक नागवेकर (कुष्ठरोग तंत्रज्ञ) यांचे पाच महिन्याचे एकूण १,८२,९१०, अविनाश रांगणकर (कनिष्ठ सहाय्यक) यांचे १७ महिन्याचे ३,६६,२८२, सुधाकर रसाळ (स्वयंपाकी) यांचे १९ महिन्याचे ३,०१,६३०, वनिता पवार आणि ताराबाई राठोड (सफाई कामगार) या दोघींचे पाच महिन्यांचे अनुक्रमे ८२,३७१ आणि ८१,०२१ एवढे वेतन शासनाकडे थकीत आहे.अनुदानाची रक्कम मिळणार का, अशी सर्वांनाच शंका असल्याने जिल्हा परिषदेच्या मंजूर अनुदानानुसार संगणक वितरण प्रणालीवर महाराष्ट्र कोषागार नियम ४४ नुसार बी. डी. एस. स्लीप निघत नसल्याने या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आलेले नाही.- दीपक नागवेकर