शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या परिस्थितीत सावकारीचा जाच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

चिपळूण शहरातील रिक्षा व्यावसायिक अभिजित गुरव या तरुणाने सावकारीला कंटाळूनच आत्महत्या केली. वेळप्रसंगी धमक्या देणे, कर्जदारांच्या घरातील वस्तू उचलून ...

चिपळूण शहरातील रिक्षा व्यावसायिक अभिजित गुरव या तरुणाने सावकारीला कंटाळूनच आत्महत्या केली. वेळप्रसंगी धमक्या देणे, कर्जदारांच्या घरातील वस्तू उचलून आणणे, वाहने जप्त करणे, कर्जदार महिलेला वसुलीच्या वेळी असभ्य भाषा वापरणे असे प्रकार सावकारांकडून नेहमीच घडत असतात. सावकाराकडून कर्ज घेणाऱ्या प्रत्येकालाच हा अनुभव येत असतो. मग तो सावकारी करणारा परवानाधारक असो अथवा विनापरवानाधारक. कर्ज वसुलीची पद्धत दोन्हीकडे सारखीच आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे सावकारीच्या या जाचात अनेकजण अडकले आहेत. अनेकांनी स्वाक्षरी केलेला धनादेश देऊन, तर काहींनी कोऱ्या बॉण्डवर सही करून आपली प्रॉपर्टी डावाला लावली आहे. त्यामुळे कर्जदार कितीही प्रामाणिक असला, तरी २० हजारांसाठी दररोज २५० रुपये व्याज आणि हप्ता चुकला तर ५०० रुपये दंड भरावाच लागतो आहे. अशाच एका कर्जातून २० हजारांसाठी एका महिलेला तब्बल एक लाख रुपये मोजावे लागले. चिपळुणातील या प्रकाराविषयी तक्रार झाल्याने तिघांवर गुन्हा दाखल झाला आणि खऱ्याअर्थाने यातील गंभीरता पुढे आली. खरेतर सावकारी करणाऱ्यांना प्रॉपर्टी, वाहने जप्त करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. अगदी तारण कर्ज असले, तरीदेखील प्रॉपर्टी जप्त करता येत नाही. कायद्यालादेखील हे अपेक्षित नाही. शिवाय सावकारी कर्ज देणाऱ्या परवानाधारकांनी रोजच्या रोज रजिस्टर नोंद करावयाची आहे. त्यावर सहाय्यक निबंधकांचे नियंत्रण असायला हवे. परंतु, या बाबींकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने ही सावकारी आता अनेकांच्या जीवावर बेतू लागली आहे. मुळात प्रत्येकाने आपली कुवत आणि परिस्थिती ओळखून खर्च करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी वायफळ खर्च व शौक करणे टाळायला हवे. अगदी तातडीची गरज असतानाही आपण कर्जबाजारी होत नाही ना, आपला खर्च वाढत नाही ना, याची काळजी घ्यायला हवी. सावकारी व्याजाच्या कर्जामुळे संसार उद्ध्वस्त होणार नाहीत, याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. सावकारी पद्धत खूप जुनी आहे. परंतु, बदलत्या काळानुसार त्याचे स्वरूपही बदलले आहे. तेव्हा अशा कर्जाविषयी प्रत्येकानेच सावधानता बाळगायला हवी.