शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वीस हेक्टरवर अळीचा हल्ला

By admin | Updated: July 4, 2014 00:12 IST

पावसाने मारले : भातशेती धोक्यात, रोपे पिवळी पडली, शेतकऱ्यापुढे संकट उभे

रत्नागिरी : जिल्ह्याचे प्रमुख पीक भात असून, पावसाअभावी भातशेती धोक्यात आली आहे. पाऊस नसल्याने राजापूर, लांजा, संगमेश्वर तालुक्यांतील २० हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. काही ठिकाणची रोपे पिवळी पडून वाळू लागली आहेत, तर काही ठिकाणी भातरोपांवर करपा रोग पडला आहे. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे रोपवाटिका एका रात्रीत नष्ट होते. राजापूर तालुक्यातील २३३ शेतकऱ्यांच्या चार हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. लांजा तालुक्यातील १५९ शेतकऱ्यांच्या ७.०९ हेक्टर क्षेत्रावर तसेच संगमेश्वर तालुक्यातील ८० शेतकऱ्यांच्या ९ हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. राजापूर तालुक्यातील बाधित क्षेत्रावर कीटकनाशकांची फवारणी करून २.७५ हेक्टर क्षेत्र तसेच लांजा तालुक्यातील प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात आला आहेजिल्ह्यातील ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. मात्र, त्यासाठी ७ हजार ३ हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी करण्यात आली आहे, तर १३०८ हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसाअभावी भातशेती पिवळी पडू लागली आहे. काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी धरणाच्या, विहिरीच्या पाण्याने भातशेती लावण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, कडकडीत उन्हामुळे भिजवलेले क्षेत्र वाळत आहे. हळव्या, गरव्या, निमगरव्या भातबियाण्यांचा शेतकऱ्यांनी वापर केला आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ३०० मिलिमीटर इतकाच पाऊस झाल्याने शेतीची अवस्था बिकट आहे. जुलै सुरू झाला असून, दुबार पेरणी करणे आता शक्य होणार नाही. कृषी विभागाकडे हळव्या जातीचे २९१ क्विंटल, निमगरवे ७५ क्विंटल, तर गरवे १५ क्विंटल भात बियाणे शिल्लक आहे. हळव्या जातीचे भात दुबार पेरणीसाठी वापरले जाऊ शकते. मात्र, निमगरवे, गरवे भात वापरणे आता शक्य नाही. या सर्व प्रकारामुळे भातशेती धोक्यात आली आहे. (प्रतिनिधी)