शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

कोकण रेल्वे : रेल्वे तिकीट आरक्षणाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 3:26 PM

दहावी, बारावीच्या परीक्षा येत्या २२ मार्चला संपणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा ओढा आता कोकणातील त्यांच्या गावाकडे आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामाकरिता मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या सहाय्याने ५२ जादा रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या गाड्यांच्या आरक्षणाला १६ मार्चपासून सुरूवातही झाली आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वे : रेल्वे तिकीट आरक्षणाला सुरूवातउन्हाळी हंगामासाठी रेल्वेच्या जादा ५२ फेऱ्या

रत्नागिरी : दहावी, बारावीच्या परीक्षा येत्या २२ मार्चला संपणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा ओढा आता कोकणातील त्यांच्या गावाकडे आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामाकरिता मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या सहाय्याने ५२ जादा रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या गाड्यांच्या आरक्षणाला १६ मार्चपासून सुरूवातही झाली आहे.गेल्या काही वर्षात कोकण रेल्वे ही कोकणवासीयांची जीवन वाहिनी बनली आहे. सण असो वा उन्हाळी हंगाम असो या कालावधीत प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीला सामावून घेण्यासाठी कोकण रेल्वे नेहमीच सज्ज असते. 

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उन्हाळी हंगामात कोकणवासीयांना प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष गाड्यांचे हे नियोजन आहे. त्याअंतर्गत क्रमांक ०१०५१चे लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी साप्ताहिक रेल्वे गाडीच्या ८ विशेष फेऱ्या सोडल्या जाणार आहेत.

१७ मे २०१९ ते ७ जून २०१९ या काळात ही गाडी मार्गावरून धावणार आहे. दर शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता ०१०५१ नंबरची रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणार आहे तर करमाळी येथून परतीची ०१०५२ क्रमांकाची रेल्वे १९ मे ते २० जून दरम्यान दर रविवारी दुपारी १२.५० वाजता मुंबईकडे रवाना होणार आहे.लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी साप्ताहिक रेल्वे क्रमांक ०१०४५/०१०४६च्या १८ फेऱ्या १२ एप्रिल ते ७ जून दरम्यान होणार आहेत. यातील ०१०४५ ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२ एप्रिल २०१९पासून दर शुक्रवारी रात्री १.१० वाजता सुटणार आहे. तर परतीची ०१०४६ ही गाडी करमाळी येथून १८ मे ते ८ जून या काळात दर शुक्रवारी दुपारी १२.५० वाजता मुंबईकडे रवाना होणार आहे.लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी व करमाळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक क्रमांक ०१०१५/०१०१६ या फेºया १८ मे ते १९ जून या काळात मार्गावर धावणार आहेत.लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड व सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे क्रमांक ०१०३७/०१०३८च्या फेऱ्या कोकण रेल्वे मार्गावर ८ एप्रिल ते ६ जून २०१९ या काळात होणार आहेत. कोकणात येणाऱ्यांची संख्या मार्च महिन्याच्या अखेरीपासून वाढणार असल्याने कोकण रेल्वेने हे नियोजन केले आहे.दरम्यान, १२०५१/१२०५२ दादर-मडगाव-दादर जनशताब्दी एक्सप्रेसला पावसाळ्यात १० जून ते ३१ आॅक्टोबर या काळात विस्टा डोम कोच जोडल्या जाणार आहेत.कोकणात गणेशोत्सवासाठीही येणाऱ्या भक्तांची संख्या खूप मोठी आहे. या उत्सवासाठी येणाऱ्या भक्तांना रेल्वे आरक्षणाची सोय चार महिने आधी उपलब्ध करून दिली जाते. यावेळी एप्रिलच्या उत्तरार्धात गणेशोत्सवासाठीच्या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. त्यासाठीही कोकण रेल्वेकडून आतापासूनच सज्जता ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी