शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

Kerala Floods : रत्नागिरीतील मुलांनी खाऊच्या पैशातून केली केरळ आपद्ग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 2:08 PM

मठ, कुंभारवाडी (ता. रत्नागिरी) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील मुलांनी आपल्या खाऊचे पैसे साठवून जमा झालेल्या २१०० रूपयांचा धनादेश प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अमित शेडगे यांच्याकडे सुपूर्द केला. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी केलेला हा पहिलाच उपक्रम.

ठळक मुद्देखाऊच्या पैशातून केली केरळ आपद्ग्रस्तांना मदतप्राथमिक शाळेतील मुलांनी केलेला पहिलाच उपक्रम

रत्नागिरी : मठ, कुंभारवाडी (ता. रत्नागिरी) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील मुलांनी आपल्या खाऊचे पैसे साठवून जमा झालेल्या २१०० रूपयांचा धनादेश प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अमित शेडगे यांच्याकडे सुपूर्द केला. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी केलेला हा पहिलाच उपक्रम.जिल्हा प्रशासनाने तसेच सामाजिक संस्थांनीही या राज्याच्या मदतीकरिता जिल्ह्याला आवाहन केले. त्यानुसार अनेक व्यापारी, उद्योजक, संस्था, व्यक्ती पुढे आल्या. तेथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने अजूनही मदतीची गरज आहे.मदत कार्यात आता विद्यार्थीही मागे नाहीत. मठ कुंभारवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या ४५ विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे साठविले आणि त्यातून गोळा झालेले २१०० रूपये त्यांनी मुख्याध्यापक संतोष आयरे यांच्याकडे जमा केले.

या रकमेचा बँक आॅफ इंडियाच्या पाली येथील शाखेचा धनादेश जिल्हा प्रशासनाकडे केरळच्या मदतीसाठी सुपूर्द करण्यात आला. उपजिल्हाधिकारी अमित शेडगे यांनी तो स्वीकारला. हा धनादेश देताना शालेय विद्यार्थी स्वराज्य सभेची मुख्यमंत्री समृद्धी साळवी, सांस्कृतिक मंत्री स्नेहा साळुंके तसेच मुख्याध्यापक संतोष आयरे उपस्थित होते.संस्कारांचा धडा कृतीतूनप्राथमिक शाळांमध्ये आनापान उपक्रमांद्वारे मुलांवर संस्कार घडविण्याचे कार्य केले जाते. मठ, कुंभारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक संतोष आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली नरेश बने, विजय इरमल, श्रद्धा रसाळ, सुशिला सरगर हे शिक्षक हा उपक्रम राबवतात. त्यामुळेच आम्ही संवेदनशीलपणे विचार करू लागलो. त्यातूनच ही मदत गोळा झाल्याचे समृद्धी साळवीने सांगितले.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरRatnagiriरत्नागिरीSchoolशाळा