शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

‘जिद्द’च्या मुलांनी जिद्दीने मिळवले यश

By admin | Updated: December 25, 2014 00:05 IST

या स्पर्धेत धावणे, गोळाफेक, लांबउडी, सॉफ्ट बॉल थ्रो, भरभर चालणे, पासिंग बॉल, स्पॉट जंप आदी स्पर्धा घेण्यात आल्या.

चिपळूण : समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरीने आयोजित केलेल्या अपंग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा विजय क्रीडा संकुल, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे शुक्रवारी मोठ्या उत्साहात झाल्या. क्रीडा स्पर्धेसाठी कर्णबधीर, मतिमंद, अंध, अस्थिव्यंग, सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग, पंचायत समितीअंतर्गत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत धावणे, गोळाफेक, लांबउडी, सॉफ्ट बॉल थ्रो, भरभर चालणे, पासिंग बॉल, स्पॉट जंप आदी स्पर्धा घेण्यात आल्या.  स्पर्धेचे उद्घाटन समाजकल्याण सभापती शीतल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दापोलीच्या सभापती गीतांजली वेदपाठक, जिल्हा परिषद सदस्य सुजाता तांबे, अजय बिरवटकर, स्मिता जावकर, प्रमोद जाधव, गटविकास अधिकारी दापोली मनीषा देवगुणे, गटशिक्षणाधिकारी जे. जे. खोत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के, सहाय्यक लेखाधिकारी समाजकल्याण विभाग विजय मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी हरिष जगताप, विस्तार अधिकारी मोहन पोवार, संजय जाधव, शुभांगी गांधी, प्रभा करमरकर, अशोक परांजपे, निलांबरी अधिकारी, माधुरी मादुस्कर, सर्व अपंग शाळेतील स्पर्धक, शिक्षक, कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १३ शाळांमधील २२० विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते. जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेतील २४ विद्यार्थी व ५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. रोशन परब, गोळाफेक प्रथम क्रमांक, १०० मीटर धावणे तृतीय, तेजस सकपाळ २०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, १०० मीटर धावणे द्वितीय, सूरज सुतार पळत येऊन लांबउडीत प्रथम, गोळाफेक प्रथम, प्रियांका भुरण १०० मीटर धावणेत प्रथम, गोळाफेक प्रथम, भूषण कांगणे २०० मीटर धावणे प्रथम, गोळाफेक द्वितीय, अंकिता लाड, स्पॉटजंप द्वितीय, १०० मीटर धावणेत तृतीय, प्रणाली नरळकर, गोळाफेक द्वितीय, सर्वेश खेराडे २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय, अश्विनी कदम, गोळाफेक द्वितीय, अमोल मोरे गोळाफेक तृतीय, आदीब मुकादम २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय आला.स्पर्धेच्या सरावासाठी मुख्याध्यापक प्रदीप दिवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक सुनील शिंदे, क्रीडाशिक्षिका आशा धुरी, उपमुख्याध्यापक उमेश कुचेकर, प्रकाश घाडगे, राजेश सावंत, प्रकाश बलाढ्ये यांनी परिश्रम घेतले. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी यश मिळवून सिंहाचा वाटा उचलला. मुख्याध्यापक प्रदीप दिवाडकर, संस्थेच्या सचिव सुमती जांभेकर यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)