शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांनी माहिती घ्यायला हवी होती, डांबर घोटाळ्याच्या आरोपावरून उदय सामंत यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 14:07 IST

'ताे गैरसमज लवकरच दूर हाेईल'

रत्नागिरी : जयंत पाटील यांनी विधानसभेत बाेलताना त्या कंपनीचे संचालक काेण आहेत, त्यांचे वय काय आहे हे पाहायला हवे होते. त्यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून माझ्या मनात आकस नाही. मात्र, त्यांनी आधी माहिती घ्यायला हवी हाेती. ते माहिती घेऊन बाेलले असते तर आनंद वाटला असता, असा टाेला राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शनने डांबर घाेटाळा केल्याचे सांगून चाैकशीची मागणी केली आहे. याबाबत मंत्री सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बाेलताना आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, जयंत पाटील यांनी ज्या कंपनीचा उल्लेख केला आहे, त्या आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शनचे संचालक माझे वडील आहेत. त्याचे वय आता ८० वर्षे आहे. दुसरी संचालक माझी आई असून, तिचे वय ७९ आहे. जयंत पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने चुकीच्या माहितीद्वारे सभागृहात अशा बुजुर्ग मंडळींचा अपमान करणे ही फार शाेकांतिका आहे.जयंत पाटील यांनी जर मला याबाबत विचारले असते तर मी त्यांना माहिती दिली असती. चुकीची कागदपत्र दाखवून ज्या माणसांनी त्यांचा गैरसमज केलेला आहे. ताे गैरसमज लवकरच दूर हाेईल. माझ्या वडिलांनी या जिल्ह्यात शेकडाे ठेकेदार तयार केले आहेत. त्यामुळे ८० टक्के काम त्या कंपनीकडे असण्याचा प्रश्नच येत नाही, असे मंत्री सामंत म्हणाले. जयंत पाटील हे रत्नागिरीचे जावई आहेत, त्यामुळे त्यांचा गैरसमज रत्नागिरीतील काेणत्या महनीय व्यक्तीने करुन दिला याचा मला शाेध घ्यावा लागेल. मात्र, ते माहिती घेऊन बाेलले असते तर आनंद झाला असता, असेही सामंत म्हणाले.

यावेळी छत्रपती संभाजी नगर येथील उद्धवसेनेच्या संकल्प मेळाव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हा संकल्प मेळावा नेमका कशासाठी आहे? याबाबत संभ्रमावस्था आहे. काँग्रेसने राज्यात जास्त जागा लढवणार असे बोलून आव्हान दिले आहे. त्याला आव्हान देण्यासाठी हा मेळावा आहे का? असा प्रश्न सामंत यांनी केला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे आम्हाला अजिबात टेन्शन नाही. आम्ही विधानसभेला २०० जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीvidhan sabhaविधानसभाJayant Patilजयंत पाटीलUday Samantउदय सामंत