शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

"दिल्लीतील भाजपा नेत्यांनीच फडणवीसांचा काटा काढला"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 2:26 PM

Vinayak Raut, Devendra Fadnavis, Narayan Rane, Ratnagiri दिल्लीतील भाजप नेत्यांनाच फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते. त्यांना मी पणाचा जो गर्व चढला होता आणि दिल्लीत नेतृत्वाची स्वप्ने पडत होती. त्यामुळेच दिल्लीतील नेत्यांनी त्यांचा काटा काढला, असा गौप्यस्फोट त्यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देभाजपच्या दिल्लीतील नेत्यांनीच फडणवीस यांचा काटा काढलाखासदार विनायक राऊतांचा हल्लाबोल, राणे यांच्यावरही टीका

चिपळूण : भाजपमधील देवेंद्र फडणवीस पुरस्कृत टवाळखोरांची विकृतबुद्धी महाराष्ट्र आणि राज्य सरकारची बदनामी करत आहे. सत्ता हातातून गेल्याने त्यांचा जळफळाट झाला आहे. त्यामुळेच ते असे विकृत चाळे करत आहेत, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर टीका केली.

दिल्लीतील भाजप नेत्यांनाच फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते. त्यांना मी पणाचा जो गर्व चढला होता आणि दिल्लीत नेतृत्वाची स्वप्ने पडत होती. त्यामुळेच दिल्लीतील नेत्यांनी त्यांचा काटा काढला, असा गौप्यस्फोट त्यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.राऊत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. कोविडसारख्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अतिशय उत्तम काम केले. राज्यात जी आरोग्य व्यवस्था उभारली गेली आणि कोविडवर नियंत्रण मिळवले गेले. त्याची दखल जगाने घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कामाचे कौतुक केले आहे. कोविड काळात राज्याची आर्थिक घडी विस्कटली असली तरी ठाकरे सरकारने त्यातून मार्ग काढत राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. लवकरच महाराष्ट्र पूर्वपदावर येईल, असेही ते म्हणाले.प्रत्यक्षात दिल्लीतील भाजप नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते. संघ आणि भाजपमध्ये मी पणाची भाषा चालत नाही. त्यांच्या प्रत्येक वाक्यात 'आम्ही' हा शब्द असतो. परंतु देवेन्द्र फडणवीस यांनी थेट 'मी' पणाची भाषा सुरू केली होती. त्यांना केंद्रीय नेतृत्त्वाचे स्वप्न पडू लागले होते. हे दिल्लीतील नेत्यांना रुचले नाही. त्यामुळेच त्यांनी फडणवीस यांचा काटा काढला, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

नारायण राणे नेहमीच पडत असतातनारायण राणे यांनी महाराष्ट्र सरकार लवकरच कोसळेल, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना खासदार राऊत म्हणाले की, नारायण राणे नेहमीच अशी भविष्यवाणी करत असतात. गेले कित्येक वर्षं आम्ही ऐकतोय. सरकार पडेल असे ते नेहमीच बोलत असतात. मात्र सरकार पडत नाही. परंतु नारायण राणे नेहमीच पडत असतात. त्यामुळे त्यांच्या या बकवासगिरीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी आणि आपले अस्तित्व जपण्यासाठी ते राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोटेनाटे आरोप करत आहेत.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणेRatnagiriरत्नागिरीBJPभाजपाShiv Senaशिवसेना