उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बॅनर फाडले, सामंत समर्थकांनी आक्रमक होत दिले थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 13:33 IST2022-09-07T13:32:27+5:302022-09-07T13:33:17+5:30

राजापूर तालुक्यातील गणेश भक्तांना शुभेच्छा देणारे हे बॅनर लावण्यात आले होते.

Industries Minister Uday Samant banner on the Mumbai Goa highway was torn down by unknown persons | उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बॅनर फाडले, सामंत समर्थकांनी आक्रमक होत दिले थेट आव्हान

संग्रहित फोटो

राजापूर : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मुंबई-गोवा महामार्गावर लावण्यात आलेले बॅनर अज्ञाताने फाडण्याचा प्रयत्न केल्याने सामंत समर्थक आक्रमक झाले आहेत. हिंमत असेल तर आमच्यासमोर बॅनरला हात लावून दाखवा, असे आव्हान सामंत समर्थकांनी दिले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ओणी ते खारेपाटण या दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते. मात्र, मागील दोन दिवसांत अज्ञात व्यक्तीने हे बॅनर फाडले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता सामंत समर्थकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राजापूर तालुक्यातील गणेश भक्तांना शुभेच्छा देणारे हे बॅनर लावण्यात आले होते. मात्र, सदर बॅनर फाडून टाकण्याचा प्रयत्न झाला. राजापूर तालुक्यातील शांतता आणि सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही सामंत समर्थकांनी दिला आहे.

Web Title: Industries Minister Uday Samant banner on the Mumbai Goa highway was torn down by unknown persons