शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

वीजग्राहकांचा एटीपीकडे वाढता कल

By admin | Updated: September 18, 2015 23:12 IST

कोकण परिमंडल : आॅगस्टमध्ये सुमारे सव्वाचार कोटीचा महसूल

रत्नागिरी : वीजबिल भरण्यासाठी रांगेत उभे राहून वेळ घालविण्यापेक्षा एटीपी केंद्रात वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. कोकण परिमंडलातील ३० हजार २६१ ग्राहकांनी एटीपीमध्ये वीजबील भरल्यामुळे आॅगस्टमध्ये तब्बल ४ कोटी २१ लाख २८ हजार ९१३ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. २४ तास एटीपी केंद्र खुले असते, शिवाय सुट्टीदिवशीही एटीपी खुले असल्यामुळे ग्राहकांना वीजबील भरणे सोपे झाले आहे.कोकण परिमंडलात एकूण पाच एटीपी केंद्र आहेत. यापैकी खेड येथील एकमेव एटीपी केंद्र बंद आहे. रत्नागिरी शहरातील ग्राहकांचा एटीपी केंद्रावर वीजबील भरण्याकडे वाढता कल आहे. १० हजार ५ ग्राहकांनी वीजबिल एटीपीमध्ये भरल्यामुळे १ कोटी ६४ लाख २६ हजार ९५२ रूपयांचा महसूल महावितरणला मिळाला आहे. चिपळूण विभागातील ८ हजार ३०६ ग्राहकांनी वीजबील भरल्यामुळे एक कोटी ३६ लाख १४ हजार ८४६ रूपयांचा महसूल मिळाला आहे. खेड येथील एटीपी केंद्र मात्र बंद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण २१ हजार ४४२ ग्राहकांनी वीजबिल भरले आहे. त्यामुळे ३ कोटी ३२ लाख १२ हजार ३२५ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन एटीपी केंद्र आहेत. कणकवली केंद्रावर ५ हजार ३५७ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे ४६ लाख ३१ हजार २९० रूपयांचा महसूल मिळाला. मालवण केंद्रावर ३ हजार ४६२ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे ४२ लाख ८५ हजार २९८ रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व कणकवली एटीपी केंद्रावर एकूण ८ हजार ८१९ ग्राहकांनी वीजबील भरल्यामुळे ८९ लाख १६ हजार ५८८ रूपयांचा महसूल मिळाला आहे. कोकण परिमंडलातील रत्नागिरी विभागातून एटीपीकडे ग्राहकांचा कल वाढता आहे. या केंद्रावर ग्राहक वीजबिल भरण्याची संख्या अधिक असल्यामुळे एका महिन्यात सुमारे दोन कोटींचा महसूल रत्नागिरी केंद्रावर मिळाला आहे. खेड एटीपी केंद्रावर ग्राहकांचा अल्पसा प्रतिसाद असल्यामुळे महावितरणने एटीपी केंद्र बंद केले आहे. रत्नागिरी विभागातील एकमेव एटीपी केंद्रावर ग्राहकांचा प्रतिसाद वाढत असल्यामुळे महावितरणने शहरात आणखी एक एटीपी केंद्रासाठी प्रस्ताव पाठविला आहे. रहाटाघर येथे नवीन उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. रहाटाघर येथे नवीन एटीपी केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर तेथे नवीन एटीपी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जेणेकरून राजापूर ते संगमेश्वर तालुक्यातील ग्राहक रत्नागिरी शहरात कामासाठी येत असतात. शहरातील खालच्या भागात जर एटीपी केंद्र उभारले तर खालच्या परिसरातील ग्राहकांना त्याचा लाभ घेता येईल. शिवाय शहरात कामासाठी येणाऱ्या लोकांनाही वीजबील भरणे सोपे होईल. त्यामुळे राहटाघर एटीपी केंद्रास मान्यता मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)ेरत्नागिरी विभागातील १३ हजार १३६ ग्राहकांनी नाचणे एटीपी केंद्रावर वीजबिल भरल्याने एक कोटी ९५ लाख ९७ हजार ४७९ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मालवण व कणकवली एटीपी केंद्रावर ८९ लाख १६ हजार ५८८ रूपयांचा महसूल मिळाला आहे.