शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून आला तरी तहान मात्र भागेना

By admin | Updated: June 15, 2014 00:35 IST

भीषण पाणी टंचाई : वाड्यांची संख्या वाढली

रत्नागिरी : गतवर्षीच्या पाणीटंचाईपेक्षा यंदा पाणीटंचाईग्रस्त वाड्यांची संख्या जास्त आहे. पाऊस सुरु झाला असला तरी जिल्ह्यातील १२२ गावांतील २९० वाड्यांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई सुरु आहे.मागील आठवड्यात १२१ गावांतील २८४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरु होती. या टंचाईग्रस्तांना १३ शासकीय आणि १५ खासगी टँकर अशा एकूण २८ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत होता़ आठवडाभराच्या कालावधीत यामध्ये १ गाव आणि ६ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली. मंडणगड, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी, रत्नागिरी, लांजा व राजापूर या तालुक्यांमध्ये चालू आठवड्यात एकाही गावाची टंचाईग्रस्तांमध्ये वाढ झालेली नाही. दापोली तालुक्यात एका गावातील एक वाडी, गुहागरमध्ये ३ वाड्यांची व चिपळूणमध्ये २ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. गतवर्षी आजच्या दिवशी १२३ गावांतील २७७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु होती. या टंचाईग्रस्तांना २८ टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र, चालू आठवड्यामध्ये गतवर्षीपेक्षा टंचाईग्रस्तांमध्ये १३ वाड्या जास्त आहेत.दरवर्षी त्या-त्याच गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. मात्र तरीही त्या गावांसाठी कायमस्वरुपी पर्याय शोधण्याबाबत लोकप्रतिनिधी उदासिन आहेत. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साठवणुकीचा विचार होत नाही त्यामुळे उन्हाळ्यात टँकरचा आधार घ्यावा लागतो. (शहर वार्ताहर)