शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: दापाेलीत सिलिंडरचा स्फोट, पती-पत्नी जखमी; मुले शाळेत गेल्याने वाचली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:12 IST

दापाेली : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फाेट हाेऊन पती-पत्नी भाजून जखमी झाल्याची घटना दापाेली शहरातील रूपनगर काॅम्प्लेक्स येथे शुक्रवारी दुपारी ...

दापाेली : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फाेट हाेऊन पती-पत्नी भाजून जखमी झाल्याची घटना दापाेली शहरातील रूपनगर काॅम्प्लेक्स येथे शुक्रवारी दुपारी घडली. त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे. सुदैवाने त्यांची दाेन मुले शाळेत गेल्याने ती या दुर्घटनेतून वाचली.अविनाश शिर्के (४०) आणि अश्विनी शिर्के (३५) असे जखमी दाम्पत्याची नावे आहेत. शहरातील रूपनगर काॅम्प्लेक्समध्ये शिर्के कुटुंब राहत आहे. शुक्रवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमाराला घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरने पेट घेतला आणि स्फाेट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, काही कळायच्या आत घरातील साहित्याची नासधूस झाली.

या स्फाेटामुळे शिर्के यांच्या खाेलीचा मुख्य दरवाजा व त्याच्या बाजूची भिंत शेजारील माने यांच्या दरवाजावर पडली. शेजारी राहणाऱ्या जाधव यांच्या घरालाही या स्फाेटाचे हादरे बसले. तसेच घराच्या खिडकीवरील ग्रील निखळून खाली पडले. त्यामुळे सदनिकेच्या खाली उभ्या असणाऱ्या चारचाकीचे किरकाेळ नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू हाेता.या घटनेत जखमी झालेल्या अविनाश शिर्के व अश्विनी शिर्के यांना प्रथम दापाेली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. तिथून पुढील उपचारासाठी मुंबईत नेण्यात आले आहे.

नागरिकांची धावाधावसिलिंडरच्या स्फोटामुळे घरातील सामानाने पेट घेतला हाेता. या आगीची माहिती मिळताच इमारतीतील रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी आग आटाेक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. ही आग वेळीच आटाेक्यात आल्याने बाका प्रसंग टळला. अन्यथा १०० कुटुंबांना धाेका पाेहाेचला असता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीfireआग