गुहागरः सेल्फीचा मोह जिवावर बेतला; पती-पत्नीचा घळीत पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 16:59 IST2021-01-02T16:32:37+5:302021-01-02T16:59:15+5:30

Accident Ratnagiri- गुहागर येथील बामणघळ पाहण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा बुडून मृत्यू

Husband and wife drown while taking selfie at Hedvi | गुहागरः सेल्फीचा मोह जिवावर बेतला; पती-पत्नीचा घळीत पडून मृत्यू

गुहागरः सेल्फीचा मोह जिवावर बेतला; पती-पत्नीचा घळीत पडून मृत्यू

ठळक मुद्देहेदवी येथे पतिपत्नींचा बुडून मृत्यूसेल्फी घेण्याच्या नादात दोघेजण घळीत पडले

गुहागर : बामणघळीतील लाटेशी माैजमाेज करताना ठाणे येथील पती-पत्नीला सेल्फी काढण्याचा माेह झाला. सेल्फी काढण्याच्या नादात बामणघळीत पडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना गुहागर तालुक्यातील हेदवी येथे शनिवारी घडली. अनंत माणगावकर (३६) आणि सुचेना माणगावकर (३३) अशी दाेघांची नावे आहेत.

गुहागर तालुक्यातील हेदवी - बामणघळ हे प्रसिद्ध ठिकाण आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना येथे जाण्याचा माेह आवरता येत नाही. बामणघळी येथे खडकातून उसळणाऱ्या लाटेचे आकर्षण पर्यटकांना असते. अनंत व सुचेना हे आई, मामेभाऊ यांच्यासमेवत फिरण्यासाठी आले हाेते. शनिवारी याठिकाणी लाटेशी माैजमजा करत असताना ठाणे येथून आलेल्या अनंत आणि सुचेना माणगावर यांना सेल्फी काढण्याचा माेह झाला. 

सेल्फी काढत असताना पत्नीचा ताेल गेला. पत्नीला पडताना पाहून पतीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्याचाही ताेल गेला आणि दाेघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पाेलीस पाटील, स्थानिक तरुण आणि गुहागरचे पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दाेघांचेही मृतदेह बाहेर काढले. नववर्षाच्या प्रारंभीच हेदवी समुद्रकिनारी झालेल्या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पर्यटनाला गालबाेट लागले आहे.

Web Title: Husband and wife drown while taking selfie at Hedvi