शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील वनौषधी होत आहे दुर्मीळ...

By admin | Updated: October 10, 2014 23:00 IST

होतोय ऱ्हास : जतन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे

फुणगूस : जंगलतोड आणि वाढत्या तापमानामुळे येथील वनौषधींचा ऱ्हास होत आहे. आरोग्यासाठी वरदान ठरलेल्या या वनौषधींची मागणी एकीकडे वाढत असताना त्या दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालल्याचे चित्र आहे. वनौषधी संवर्धनाबाबत शासन आणि कृ षी विभागाने फारशी जागरुकता न दाखवल्याने हा वनसंपत्तीचा ठेवा नष्ट होत आहे. त्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.रत्नागिरी जिल्हा हा दुर्गम आणि डोंगराळ आहे. जिल्ह्याला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. येथील जंगली वनस्पती जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालत आहेत. आंबा, काजू, फणस, रातांबी, जांभूळ, साग, खैर, पळस आदी वृक्षांबरोबरच अनेक दुर्मीळ झाडे येथे आढळतात. कुडा, आघाडा, बेहडा, त्रिफळा, नागकेशर, हिरडा, धोत्रा, कोरफड आदी असंख्य प्रकारच्या वनौषधी जंगली प्रदेशात आढळत आहेत. या वनौषधीपासून घरगुती औषधे बनवून त्यापासून रुग्णांवर उपचार करण्याचे काम ग्रामीण भागातील वैद्य मंडळी करत असत. अनेक असाध्य रोगांवर ही औषधे रामबाण ठरत असल्याने डॉक्टरांपेक्षाही वैद्याकडून इलाज करुन घेण्यात धन्यता मानणारे लोक आजही दिसून येतात.अ‍ॅलोपॅथीमध्येही वनौषधींचा वापर होत असल्याने त्यांना देशाबरोबर परदेशातही मागणी असते. आज बहुराष्ट्रीय कंपन्यांची असंख्य प्रकारची औषधे बाजारात येत आहेत. या सर्वांमध्ये येथील वनौषधींचा वापर झालेला असतो. काही वनौषधींचा वापर केवळ वनौषधीसाठीच होत नसून भाजीसाठीही होतो. त्यामुळे खवय्यांची गरज म्हणूनही या वनौषधींची तोड केली जाते. त्याचप्रमाणे सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीतही त्या महत्त्वपूर्ण असल्याने कंपन्यांबरोबरच महिलावर्गातही त्यांना मागणी असते.गरज भागवण्यासाठी या औषधींची केवळ तोड होत असून, लागवडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धन केले नाही तर या वनौषधी पूर्णपणे नामशेष होतील. त्यांच्या लागवडीसाठी शासनाने प्रयत्न करण्याची मागणी करण्यात येत आहे. या भागात जंगलामध्ये दुर्मीळ वनौषधी मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, त्याचे संवर्धन होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने यात लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)