शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

होमगार्डस्ना ना मान, ना धन; विविध प्रकारे उपेक्षा

By admin | Updated: November 22, 2014 00:13 IST

सरकारकडून अपेक्षा : आर्थिक उपेक्षा थांबणार कधी हा प्रश्न अनुत्तरीतच

श्रीकांत चाळके - खेड --राज्यातील वाढत्या दहशतवादाला तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दल कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. अशातच गृहरक्षक दलाचे महत्त्व विविध प्रकारे वाढले आहे. मात्र, आजही राज्य सरकारकडून होमगाडर््सची विविध प्रकारे उपेक्षा केली जात आहे. याची गंभीर दखल नव्या सरकारने घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.आपद्ग्रस्त परिस्थिती तसेच विविध धार्मिक सणासाठी होमगार्ड्सना कर्तव्यावर बोलावले जाते. यावेळी कर्तव्यावर असतानाच भत्ता दिला जातो. मात्र, इतर वेळी होमगार्ड्सना घरी बसावे लागते. त्यांना मजुरीची कामेही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे होमगाडर््सच्या या भत्त्यात वाढ करून धुलाई भत्ता वाढवून देण्याची जाहीर घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप होमगाडर््सना कोणत्याही सुविधेचा लाभ झाला नाही. आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या होमगार्ड्सना ना मान ना धन अशा स्थितीत काम करावे लागत आहे. शासकीय कर्तव्यावर असताना पोलिसांप्रमाणे दिवस-रात्र कर्तव्य पार पाडावे लागत आहे़ हे कमी म्हणून की काय, ज्या पोलीस हवालदारांसमवेत कर्तव्यावर पाठविले जाते, त्याची खासगी कामेही यांच्याकडून करून घेतली जातात. पान, सुपारी आणण्यापासून ते चहावाल्याला चहा आण म्हणून सांगण्यास जाण्यासाठी होमगार्ड्सचा वापर केला जातो. कर्तव्य पोलिसांप्रमाणे असले तरी वर्दीप्रमाणे अधिकार नसल्याने होमगाडर््सना मागासलेपणाची जाणीव होत राहाते. एवढे सहन करूनही होमगार्ड्सना पगार देतानाही सरकार हात आखडता घेते, याविषयी प्रचंड नाराजी आहे. होमगाडर््सना प्रतिमहिना निश्चित समाधानी पगार किंवा मानधन मिळाल्यास चरितार्थ चालविणे सुलभ होऊ शकेल. सद्यस्थितीतील होमगार्डना मिळणारे अधिकार पुरेसे नसल्याने जनतेकडून मिळणारा मान तितकासा समाधानकारक नाही. शिवाय कर्तव्याच्या प्रमाणात धन पुरेसे नसल्याने होमगाडर््स कायमस्वरूपी चिंताग्रस्त आहेत. ‘ना मान ना धन’ अशा विपरीत अवस्थेत होमगाडर््स आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे़ याकामी आता शासनाने पुढाकार घेऊन होमगार्डना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे. याकडे सरकार लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.गृहरक्षक दलाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी गेले अनेक दिवस करण्यात येत आहे. त्यांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने ते कधी सोडविणार, असा प्रश्न विचारला जात आहे. कर्तव्य भावनेतून हे आवश्यक आहे.