रत्नागिरी : हापूसच्या उत्कृष्ट चवीमुळे परदेशातील ग्राहकांनादेखील त्याची भुरळ पडली आहे. अमेरिका, युरोप, कॅनडा, रशिया, आॅस्ट्रेलिया, दुबई येथे हापूसला मागणी आहे. गतवर्षीपासून युरोप, कॅनडा, रशिया येथूनही मागणी नोंदविण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच हॉलंडमधून हापूसची मागणी करण्यात आली आहे. ५०० टन हापूस आंब्याची मागणी हॉलंडने केली आहे.प्रत्येक देशाच्या मागणीनुसार आंब्यावर प्रक्रिया करुन आंबा निर्यात केला जातो. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्वाधिक आंबा हा मुंबईतील वाशी बाजारात विक्रीसाठी पाठवला जातो. वाशी बाजारमधून विविध देशांमध्ये हा आंबा निर्यात केला जातो. वाशी बाजारात पणन मंडळातर्फे नवीन रेडिएशन प्लान्ट उभारण्यातआला आहे. या प्लान्टमध्ये आंब्यावर उष्णजल, बाष्पजल प्रक्रिया करण्यात येते. रत्नागिरीतील हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्रामध्ये उष्णजल प्रक्रिया करुन आंबा निर्यात करण्यात येतो. हॉलंड येथील पथकाने रत्नागिरीच्या आंबा निर्यात केंद्राला भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी ५०० टन हापूसची मागणी नोंदवली आहे.यावर्षी आंबा कमी असताना त्याला परदेशातून मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, आंब्याला चांगला दर मिळावा यासाठी मँगोनेट सुविधा सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षात मॅगोनेटद्वारे शेतकऱ्यांनी परदेशात आंबा निर्यात केला होता. बहुतांश शेतकरी वाशी बाजारावर विसंबून असतात. वाशी बाजारात आंबा येण्याचे प्रमाण वाढले की, त्याचे दर कोसळतात. यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादन कमी आहे. उत्पादन कमी असूनही समाधानकारक दर नाही. त्यामुळे आंबा उत्पादनासाठी केलेला खर्च भरून काढणे शेतकऱ्यांना कष्टदायक बनले आहे. हॉलंडने आपली बाजारपेठ खुली केली असल्याने शेतकºयांमधून समाधान व्यक्त होत आहे. परदेशात आंबा पाठवण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते. कीटकनाशक रेसिड्यू फ्री असलेल्या आंब्याची निवड करण्यात येते. आंबा पिकावर हवामानामुळे होणारे परिणाम व रेसिड्यू फ्री कीटक नाशकांसाठी कृषी विद्यापीठातर्फे संशोधन होणे गरजेचे आहे.परदेशवारीपूर्वी तपासणी वाशीत उष्णजल, बाष्पजल प्रक्रियापरदेशात आंबा पाठवण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते. वाशी बाजारात पणन मंडळातर्फे नवीन रेडिएशन प्लान्ट उभारण्यातआला आहे. या प्लान्टमध्ये आंब्यावर उष्णजल, बाष्पजल प्रक्रिया करण्यात येते.
हापूसला हॉलंड बाजारपेठ खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:56 IST