शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यां’चा बंधूभाव जीवनापासून मृत्यूपर्यंतचा...!

By admin | Updated: July 16, 2015 00:29 IST

आडवलीवर शोककळा : भावाचा मृत्यू सहन न झाल्याने दुसऱ्या भावाचाही हृदयविकाराने मृत्यू

राजापूर : धाकट्या भावाच्या निधनाचा मानसिक धक्का बसल्याने मोठ्या भावाचा हृदय विकाराच्या धक्क्याने अंत झाला. ही हृदयद्रावक घटना आडवली गावी घडली.तालुक्याच्या सौंदळ पट्ट्यातील आडवली गावी यशवंत कृष्णा चव्हाण (५४) हे आपल्या कुटुंबासमवेत राहात होते. ते एकूण सहा भाऊ असून, परिवार मोठा आहे. स्वत: यशवंत चव्हाण हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात संपूर्ण परिसरात चांगलेच परिचित होते. काही वर्षे ते आडवली गावचे सरपंचदेखील होते. शिवाय व्यावसायिक होते.मागील काही महिने ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते. रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात आठवड्यातून तीन वेळा डायलेसीस करण्यासाठी त्यांना न्यावे लागत होते. गेल्या चार - पाच दिवसांपासून त्यांची प्रकृ ती नाजूक बनली होती. परिणामी हातखंबा येथील मुलीकडे त्यांना ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांचा मुलगा सूर्यकांत व अन्य सदस्य त्यांना रत्नागिरीला आणत असतानाच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली. नंतर त्यांचे पार्थिव आडवलीत आणण्यात आले. या घटनेची माहिती सर्व नातेवाईकांना देण्यात आली. यशवंत चव्हाण यांचे भाऊ मुंबईत राहतात. तेदेखील आपापल्या कुटुंबासमवेत घरी पोहोचले तोवर सर्व तयारी पूर्ण झाली होती. गावातील ग्रामस्थही अंत्यविधीला हजर होते.आपल्या भावाचे शव पाहून मयत यशवंत चव्हाण यांचे ज्येष्ठ बंधू शंकर कृष्णा चव्हाण (६०) यांना शोक अनावर झाला व त्या घटनेचा जोरदार मानसिक धक्कासुद्धा बसला. मात्र, स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत ते लगतच्या वहाळावर नैसर्गिक विधीसाठी गेले. काही क्षणातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व ते तत्काळ खाली कोसळले. तत्पूर्वी मदतीसाठी त्यांनी जोरदार आरडाओरडा केला. पण ते ऐकायला जवळ कुणीच नव्हते. सर्वजण मृत यशवंत चव्हाण यांच्या अंत्ययात्रेच्या तयारीत होते. तेवढ्यात बाजूला कुणीतरी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. त्याने आरडाओरड करताच अंत्ययात्रेतील अनेकांनी त्या वहाळाकडे धाव घेतली. त्यावेळी शंकर जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळले. काहींनी त्यांना धरुन तत्काळ सौंदळला डॉक्टरकडे नेले. पण, तोवर फार उशीर झाला होता.या घटनेने आडवलीत खळबळ उडाली. एका भावाच्या अंत्ययात्रेची तयारी सुरु असतानाच विरह सहन न झाल्याने दुसरा भाऊ मृत्यूमुखी पडला होता. अखेर दोन्ही भावांची अंत्ययात्रा एकाच दिवशी निघाली व स्मशानात बाजूबाजूलाच दोन्ही भावांनी चीरनिद्रा घेतली. या घटनेने आडवलीसह सौंदळ पट्ट्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत यशवंत कृष्णा चव्हाण हे आडवली गावचे शिवसेना शाखाप्रमुख सूर्यकांत चव्हाण यांचे वडील होते. या दु:खद घटनेनंतर शोकाकूल चव्हाण कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी अनेकांनी त्यांच्या घरी धाव घेतली. यशवंत यांच्यामागे पत्नी व दोन मुलगे, तर शंकर चव्हाण यांच्यामागेही मोठा परिवार आहे. (प्रतिनिधी)