Ratnagiri: सातवीत शिकणाऱ्या हेरंबने शोधला लघुग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:41 IST2026-03-12T17:40:41+5:302026-03-12T17:41:42+5:30

दापोली (जि. रत्नागिरी ) : दापोली येथील हेरंब मुकुंद लोंढे हा इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी असून, त्याने आंतरराष्ट्रीय ॲस्टेराॅइड ...

Heramba Londhe a seventh grader from Dapoli discovered a possible asteroid | Ratnagiri: सातवीत शिकणाऱ्या हेरंबने शोधला लघुग्रह

Ratnagiri: सातवीत शिकणाऱ्या हेरंबने शोधला लघुग्रह

दापोली (जि. रत्नागिरी) : दापोली येथील हेरंब मुकुंद लोंढे हा इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी असून, त्याने आंतरराष्ट्रीय ॲस्टेराॅइड सर्च कॅम्पेनमध्ये सहभाग घेत दुर्बिणीने टिपलेल्या अवकाशातील प्रतिमांचा अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान हेरंबच्या तीक्ष्ण निरीक्षणातून हालचाल करणाऱ्या एका संभाव्य लघुग्रहाची नोंद झाली आहे.

त्याने नोंदवलेले हे निरीक्षण ‘L.Heramb – P12kFHS’ या कोडसह प्रीलिमिनरी ॲस्टेरॉइड डिटेक्शन म्हणून नोंदवण्यात आले आहे. या संभाव्य लघुग्रहाची पुढील वैज्ञानिक पडताळणी मायनर प्लॅनेट सेंटरमार्फत सुरू असून, ही संस्था इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियनअंतर्गत जगभरातील लघुग्रह शोधांची अधिकृत नोंद ठेवते.

हेरंब सध्या खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे वडील डॉ. मुकुंद सुखदेव लोंढे हे पशुवैद्यकीय अधिकारी, तर आई डॉ. रेणू मुकुंद लोंढे यादेखील पशुवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

Web Title : रत्नागिरी: सातवीं कक्षा के हेरंब ने अंतरिक्ष अभियान में खोजा क्षुद्रग्रह

Web Summary : रत्नागिरी के दापोली के सातवीं कक्षा के छात्र हेरंब लोंढे ने एक अंतरराष्ट्रीय क्षुद्रग्रह खोज अभियान के दौरान एक संभावित क्षुद्रग्रह की खोज की। उनका अवलोकन, 'एल.हेरंब - पी12केएफएचएस,' माइनर प्लैनेट सेंटर द्वारा वैज्ञानिक समीक्षा के अधीन है।

Web Title : Ratnagiri: Seventh-grader Heramb Discovers Asteroid During Space Campaign

Web Summary : Heramb Londhe, a seventh-grade student from Dapoli, Ratnagiri, discovered a potential asteroid during an international asteroid search campaign. His observation, 'L.Heramb – P12kFHS,' is under scientific review by the Minor Planet Center.