शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: खेड तालुक्यात मुसळधार पाऊस, जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर; खेड-दापोली वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:34 IST

तुळशी घाटात दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत

खेड : तालुक्यात मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, शहरातील जगबुडी नदीने गुरुवारी दुपारी १ वाजता धोका पातळी गाठली. या नदीची धोका पातळी ७ मीटर असून, दुपारी ४ वाजता नदीचे पाणी ९.९० मीटरवरून वाहत होते. यामुळे खेड शहरात नदी किनारी असलेल्या मटण, मासळी बाजारात व बाजारपेठेत पाणी शिरले आहे.बुधवारी दिवसभर उघडीप दिलेल्या पावसाने रात्री उशिरा संततधार सुरू केली होती. गुरुवारी पहाटे ६ वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत जगबुडीची पाणी पातळी ६.४० मी. एवढी स्थिर होती. मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे सकाळी ९ वाजता त्यामध्ये वाढ होऊन ६.७० मी. एवढी झाली. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्याने सकाळी पुन्हा एकदा पाण्याची पातळी कमी होऊन ६.५० मी. झाली. मात्र पुन्हा एकदा पाऊस मुसळधार कोसळून नदीची पातळी ११ वाजता ६.८० मी., तर दुपारी १२ वाजता ६.९० मी. एवढी झाली.

यावर्षी १५ मेपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने जगबुडीची इशारा पातळी गाठली होती. मात्र मान्सून नियमित झाल्यानंतर पहिल्यांदा जगबुडीने दुपारी १ वाजता धोका पातळी गाठली. जगबुडी व नारंगी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्यामुळे खेड-दापोली मार्गावर सुर्वे इंजिनिअरिंगनजीक रस्त्यावर दुपारी पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. पावसाची संततधार सुरूच राहिल्याने जगबुडी नदीची पाणी पातळी ४ वाजता ९.९० मीटरपर्यंत गेली होती. त्यामुळे खेड बाजारपेठेतील निवाचा चौक, गांधी चौक सफा मस्जिद चौक, वाल्की गल्ली या ठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली.

खेड-दापोली वाहतूक ठप्पनारंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने खेड-दापोली मार्गालगतचा संपूर्ण परिसर जलमय झाला. खेडहून दापोली व मंडणगडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. खेड - बहिरवली मार्गावरील सुसेरी रस्त्यावर पाणी आल्यामुळे खाडीपट्ट्याकडे जाणारा मार्ग बंद झाला होता.