शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील १३ गाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 2:33 PM

मध्य-दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम रेल्वेमधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १३ गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टी व पूर परिस्थितीचा फटका गाड्यांना बसला आहे.मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील १३ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.

रत्नागिरी - मध्य-दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम रेल्वेमधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १३ गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा फटका गाड्यांना बसला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या रद्द करण्याची वेळ आली आहे.  तर अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक अजूनही कोलमडलेले आहे. 

९ ऑगस्टला मूळ स्थानकावरून सुटणाऱ्या व १० ऑगस्ट रोजी कोकण रेल्वेवरून जाणाऱ्या १२४३१ राजधानी व १६३३८ ओखा एक्स्प्रेस, १०  ऑगस्टला मूळ स्थानकावरून सुटणाऱ्या व ११  ऑगस्ट  रोजी कोकण रेल्वेवरून जाणाऱ्या १२२१७ कोचुवेली - चंदीगड, २२६५३ निझामुद्दीन, १६३४६ नेत्रावती एक्स्प्रेस, १२ ऑगस्टला कोकण रेल्वेवरून जाणारी १६३४५ डाऊन नेत्रावती, १२  ऑगस्टला मूळ स्थानकावरून सुटणाऱ्या व १३  ऑगस्ट  रोजी कोकण रेल्वे वरून जाणाऱ्या ११०९७ पुणे - एर्नाकुलम, १२६१८ डाऊन मंगला, २२६६० डेहराडून - कोचुवेली, १३  ऑगस्टला मूळ स्थानकावरून सुटणारी व १४  ऑगस्ट  रोजी कोकण रेल्वेवरून जाणारी २२१४९ एर्नाकुलम - पुणे, १२ ऑगस्टला मूळ स्थानकावरून सुटणाऱ्या व १३  ऑगस्ट  रोजी कोकण रेल्वेवरून जाणाऱ्या २२१५० पुणे - एर्नाकुलम, १२२१८ चंदीगड - कोचुवेली, १६  ऑगस्टला मूळ स्थानकावरून सुटणारी व १७  ऑगस्ट  रोजी कोकण रेल्वेवरून जाणारी २२१४९ एर्नाकुलम - पुणे या गाड्यांचा समावेश आहे.

मंगला एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, कोंकण कन्या, नेत्रवती एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, डबल डेकर एक्सप्रेस, कोचुवेल्ली-मुंबई एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस या गाडय़ा शुक्रवारी (८ ऑगस्ट) जवळपास एक ते पाच तास उशिरा धावत होत्या. तसेच कारवार-यशवंतपूर एक्सप्रेस, मुंबई-करमळी एसी एक्सप्रेस, करमळी-मुंबई एसी एक्सप्रेस, पुणो-एर्नाकुलम एक्सप्रेस, एर्नाकुलम-पुणो एक्सप्रेस, हापा-मडगाव एक्सप्रेस, मडगाव-हापा एक्सप्रेस, मडगाव-मेंगलोर एक्सप्रेस, कन्नूर-कारवार एक्सप्रेस, कारवार - यशवंतपूर एक्सप्रेस, यशवंतपूर-कारवार एक्सप्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. 

पावसामुळे दक्षिण मध्य रेल्वे वेळापत्रकावरही परिणाम झाला. कर्नाटकच्या गोकाक-पाच्छापूर या भागातील १०७ व १०९ क्रमाकांच्या रेल्वे पुलावर पाणी आल्याने वास्को ते हुबळी पर्यंतच्या थांबविण्यात आल्या. त्यामुळे बुधवारी निझामुद्दीनहून वास्कोला येण्यासाठी सुटलेली गाडी अंकई, दौंड, करमाड, सोलापूर, होटगी, विजापूर, गदग, हुबळी, लोंढा या मार्गे वळविण्यात आली तर वास्कोहून निजामुद्दीनला जाण्यासाठी गुरुवारी निघालेली गाडी मडगाव, रोहा, पनवेल, इगतपुरी, मनमाड या मार्गे वळविण्यात आली. तर वास्को-बंगळुरु एक्सप्रेस गाडीसाठी गोव्याहून जाणा:या रेल्वेला डब्यांची कमतरता जाणवल्याने हुबळीपर्यंत ती रद्द करण्यात आली.

 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRainपाऊसrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे