ज्ञानेश्वर विद्यापीठाची पदवी वैयक्तिक ज्ञानासाठी :उदय सामंत यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:48 AM2020-01-07T11:48:19+5:302020-01-07T11:49:37+5:30

पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या सरकारी मान्यतेचा मुद्दा उपस्थित केला जात असला तरी आपण या विद्यापीठातून घेतलेली पदवी वैयक्तिक ज्ञानासाठी आहे. आजतागायत आपण या पदवीचा फायदा घेऊन कोणत्याही प्रकारचा सरकारी लाभ अथवा नोकरी मिळवलेली नाही, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

 Gyaneshwar University Degree for Personal Knowledge: Uday Samant's tola | ज्ञानेश्वर विद्यापीठाची पदवी वैयक्तिक ज्ञानासाठी :उदय सामंत यांचा टोला

ज्ञानेश्वर विद्यापीठाची पदवी वैयक्तिक ज्ञानासाठी :उदय सामंत यांचा टोला

Next
ठळक मुद्देज्ञानेश्वर विद्यापीठाची पदवी वैयक्तिक ज्ञानासाठी :उदय सामंत यांचा टोलापदवी बोगस असल्याचा डॉ. अभिषेक हरदास यांचा आरोप

चिपळूण : पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या सरकारी मान्यतेचा मुद्दा उपस्थित केला जात असला तरी आपण या विद्यापीठातून घेतलेली पदवी वैयक्तिक ज्ञानासाठी आहे. आजतागायत आपण या पदवीचा फायदा घेऊन कोणत्याही प्रकारचा सरकारी लाभ अथवा नोकरी मिळवलेली नाही, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीउदय सामंत यांनी चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये तंत्रशिक्षण खात्याचे मंत्रीपद मिळवलेल्या सामंत यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून ऑटोमोबाईल इंजिनिअरींगचा डिप्लोमा केला असल्याचा त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. मात्र, या विद्यापीठाला सरकारी मान्यता नसल्याचा आरोप करत पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरदास यांनी सामंत यांची पदवी देखील बोगस असल्याचा आरोप केला आहे. याबाबत सामंत यांनी सोमवारी चिपळूण दौऱ्यावर आले असताना या आरोपांचे खंडन केले.

ते पुढे म्हणाले की, आपण बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण म्हणून ज्ञानेश्वर विद्यापीठाची पदवी घेतली. आपल्या वैयक्तिक ज्ञानात भर पडावी यासाठीच ही पदवी घेतली. कोणताही शासकीय स्वरूपाचा फायदा या पदवीच्या माध्यमातून आपण घेतलेला नाही किंवा घेणारही नाही. मात्र, ज्या व्यक्तीने आपल्या पदवीचा मुद्दा उपस्थित केला त्याचे तितकेच धन्यवाद मानावेसे वाटतात. कारण त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत आपले काम राज्यभरात पोहोचवण्यासाठी एकप्रकारे मदत केली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

 

Web Title:  Gyaneshwar University Degree for Personal Knowledge: Uday Samant's tola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.