शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

चिपळुणात २६ लाखांचा गुटखा जप्त, तीन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 6:00 PM

चिपळूण शहरातील खाटीक आळी परिसरात मटण मार्केटजवळ असलेल्या नजराणा इमारतीच्या खाली गुटख्याने भरलेली मारुती इको व आयशर टेम्पो ही दोन्ही वाहने शुक्रवारी दुपारी काही नागरिकांनी पकडली आणि पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तीन गुटखा बहाद्दरांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतले. गुटखा आणि दोन वाहनांसह सुमारे २६ लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला. या संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देचिपळुणात २६ लाखांचा गुटखा जप्त, तीन जणांना अटकगुटखा विक्रीसाठी आणल्याची दिली कबुली

चिपळूण : शहरातील खाटीक आळी परिसरात मटण मार्केटजवळ असलेल्या नजराणा इमारतीच्या खाली गुटख्याने भरलेली मारुती इको व आयशर टेम्पो ही दोन्ही वाहने शुक्रवारी दुपारी काही नागरिकांनी पकडली आणि पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तीन गुटखा बहाद्दरांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतले. गुटखा आणि दोन वाहनांसह सुमारे २६ लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला. या संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी दशरथ बांबळे यांनी चिपळूण पोलीस स्थानकात रात्री उशिरा तक्रार दिली. त्यानुसार आरोपी मुश्ताक कच्छी (रा. चिपळूण), अंकुश केसरकर व संदीप पाटील (दोघेही रा. सावंतवाडी) यांनी आपल्या ताब्यातील दोन्ही वाहनांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी सुपारी, पान मसाला भरुन वाहने उभी करुन ठेवली होती. याबाबत जागरुक नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी येत वाहनांची तपासणी केली असता, वाहनांमध्ये गुटखा असल्याचे निदर्शनाला आले.याबाबत संबंधित वाहनधारकांकडे चौकशी केली असता, त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस खाक्या दाखवताच हा गुटखा इतर ठिकाणी विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली. याबाबत चिपळूण पोलीस स्थानकात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे, उपनिरीक्षक समद बेग, पोलीस नाईक आशिष भालेकर, पंकज पडेलकर, नाईक आदिती जाधव यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी