रत्नागिरी : जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक आणि वापराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुहागर येथे एकाला ताब्यात घेतले आहे. संजय श्रीधर फनगुसकर (रा. वेलदूर, ता. गुहागर) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून गावठी कट्टा, बंदूक आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक शनिवारी गुहागर पोलिस स्थानक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. गुहागर ते श्रृंगारतळी जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पदरीत्या दुचाकीवरून जाणाऱ्या संजय श्रीधर फनगुसकर (रा. वेलदूर, ता. गुहागर) याला पोलिसांनी अडवले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अवैधरित्या बाळगलेली शस्त्रे मिळाली.यामध्ये पोलिसांनी एक सिंगल बॅरल बंदूक, एक गावठी कट्टा, आठ जिवंत काडतुसे सापडली. तसेच त्याच्याकडून दुचाकीही जप्त करण्यात आली. या कारवाईत पाेलिसांनी एकूण १ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी संजय फनगुसकर याच्याविरुद्ध गुहागर पोलिस स्थानकात शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गुहागर पोलिस करत आहेत.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बोरकर, हवालदार विनायक राजवैद्य, प्रवीण खांबे, गणेश सावंत आणि चालक अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.
Web Summary : Ratnagiri police seized illegal weapons, including a country-made pistol and live cartridges, in Guhagar. Sanjay Phanguskar was arrested. Police seized weapons worth ₹1,60,800. Investigation underway.
Web Summary : रत्नागिरी पुलिस ने गुहागर में अवैध हथियार जब्त किए, जिसमें एक देशी पिस्तौल और जिंदा कारतूस शामिल हैं। संजय फंगुसकर को गिरफ्तार किया गया। पुलिस ने ₹1,60,800 के हथियार जब्त किए। जांच जारी है।