शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

धान्य दुकानात खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2015 23:45 IST

खेड तालुका : रेशनदुकानांच्या काळाबाजाराकडे दुर्लक्ष

खेड : तालुक्यातील काही रास्त दराच्या धान्य दुकानांमध्ये अद्यापही काळाबाजार होत आहे. रजिस्टरद्वारे येथील दुकानचालकांकडून योग्य प्रकारे हिशोब दाखवण्यात येत असला तरी प्रत्यक्षात कार्डधारकाला काहीही मिळत नाही. यामुळे रास्त दुकानांची तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र, हे नियम अनेकवेळा अधिकारीही पाळत नसल्याचे पुढे आले आहे. काही दुकानांतून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकानात धान्य आणलेच नाही तर काहींनी धान्य आणले असले तरीही ते ग्राहकांना दिले नसल्याचे वास्तव आता पुढे येत असून, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. ऐन गणेशोत्सवात अनेक धान्य दुकानांवर खडखडाट झाल्याने सामान्य गणेशभक्तांना दुप्पट दराने वस्तू किराणा दुकानातून घ्याव्या लागल्या. त्यामुळे अनेक ग्राहकांनी याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पुरवठा अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर दुकानांची पाहणी करणे आवश्यक होते. मात्र, ही तपासणी झालीच नाही. ऐन गणेशोत्सवाप्रसंगी या दुकानांमधून धान्याचा खडखडाट झाल्याने ग्राहकांना धान्य उपलब्ध होऊ शकले नाही. काहींनी गणपतीच्या आगमनाच्या एक दिवस अगोदरच धान्य दुकान उघडले होते़ अनेकांनी सरकारचे नियम पाळले असले तरीही काही मोजक्या दुकानदारांच्या अरेरावीपणाचा फटका तेथील ग्राहकांना बसत असल्याचे सांगण्यात येत आहे़ या दुकानांची तपासणी गेले काही वर्षे झाली नसल्याचे समजते. रेशनदुकानदारांकडून कधीही दुकाने उघडणे आणि अवेळी बंद करणे याबरोबरच खराब धान्य बदलून न देणे तसेच उर्मट भाषा वापरणे असे प्रकार वारंवार घडत आहेत़ मात्र, अशा प्रकाराकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून अशा दुकानदारांना वचक बसण्यासाठी आता थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत गाऱ्हाणी मांडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)गणरायही नाही पावले...गणेशोत्सवात वेळेत धान्य पुरवठा होईल आणि त्याचबरोबर तेल आणि साखरही रेशनदुकानांवर मिळेल, या आशेत सर्वसामान्य भक्तगण होते. प्रत्यक्षात गणेशोत्सवात वेगळेच चित्र दिसले. जे नियमित धान्य मिळत होते, त्याचाही खडखडाट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे नेहमीचे धान्यही रेशनदुकानावर मिळाले नाही. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात भक्तांची पंचाईत झाली.