शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तिवेतनावरील खर्च शासनाने उचलावा

By admin | Updated: June 30, 2014 00:18 IST

संतोष पवार : नगरपरिषद कर्मचारी संघटना उद्या काढणार मोर्चा

चिपळूण : राज्यातील सर्व नगरपरिषदा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरिता नगर परिषदेतील कर्मचारी काम करीत असतात. राज्य व केंद्र सरकारप्रमाणे जबाबदारी उचलण्याचे काम ते करीत असतात. नागरिकांना दैनंदिन सेवा देण्यावरही त्यांचा भर असतो. त्यांच्या निवृत्तिवेतनावर होणारा १०० टक्के खर्च सरकारने उचलला पाहिजे, असे प्रतिपादन म्युनिसिपल एम्प्लॉयी युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटना व अन्य विविध संघटनांतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर दि. १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी आज (रविवारी) नगर परिषद येथे कर्मचारी संघटनांची बैठक घेण्यात आली. यावेळी पवार बोलत होते. या बैठकीस एम्प्लॉयी संघटनेचे उपाध्यक्ष देवराम मुके, चिपळूण नगरपरिषद कामगार संघटनेचे अनंत हळदे, रत्नागिरी येथील संतोष पेढांबकर, संजय गोडबोले, खेड येथील संतोष जाधव, गुहागर येथील नितीन इंदुलकर, दापोली येथील स्वप्नील महाकाळ, रमेश कांबळे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत संघटनेतर्फे मोर्चे, आंदोलने करुनही राज्य शासनाने मागण्यांबाबत अद्याप कोणती ठोस भूमिका घेतलेली नाही, असे पवार यांनी सांगितले. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती यामधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे १०० टक्के वेतन द्यायला हवे. या प्रमुख मागणीसह विविध १९ मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभर आंदोलन छेडले जाणार आहे. प्रथम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मागण्यांबाबत सरकारने विचार केला नाही, तर दि. १५ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.शासनाने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आता तरी गांभीर्याने विचार करावा अन्यथा, आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)चिपळूण : राज्यातील सर्व नगरपरिषदा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरिता नगर परिषदेतील कर्मचारी काम करीत असतात. राज्य व केंद्र सरकारप्रमाणे जबाबदारी उचलण्याचे काम ते करीत असतात. नागरिकांना दैनंदिन सेवा देण्यावरही त्यांचा भर असतो. त्यांच्या निवृत्तिवेतनावर होणारा १०० टक्के खर्च सरकारने उचलला पाहिजे, असे प्रतिपादन म्युनिसिपल एम्प्लॉयी युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटना व अन्य विविध संघटनांतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर दि. १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी आज (रविवारी) नगर परिषद येथे कर्मचारी संघटनांची बैठक घेण्यात आली. यावेळी पवार बोलत होते. या बैठकीस एम्प्लॉयी संघटनेचे उपाध्यक्ष देवराम मुके, चिपळूण नगरपरिषद कामगार संघटनेचे अनंत हळदे, रत्नागिरी येथील संतोष पेढांबकर, संजय गोडबोले, खेड येथील संतोष जाधव, गुहागर येथील नितीन इंदुलकर, दापोली येथील स्वप्नील महाकाळ, रमेश कांबळे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत संघटनेतर्फे मोर्चे, आंदोलने करुनही राज्य शासनाने मागण्यांबाबत अद्याप कोणती ठोस भूमिका घेतलेली नाही, असे पवार यांनी सांगितले. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती यामधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे १०० टक्के वेतन द्यायला हवे. या प्रमुख मागणीसह विविध १९ मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभर आंदोलन छेडले जाणार आहे. प्रथम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मागण्यांबाबत सरकारने विचार केला नाही, तर दि. १५ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.शासनाने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आता तरी गांभीर्याने विचार करावा अन्यथा, आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)