शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावरून जाताय... खड्ड्यात जाल

By admin | Updated: February 2, 2015 23:58 IST

रस्त्यावरील फरशी पुलांचे बांधकाम करण्यासही खोदले खड्डे

पाटण : कोकणशी जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून कऱ्हाड-चिपळूण हा राज्यमार्ग आहे. या राज्यमार्गाची कऱ्हाड ते पोफळी दरम्यान अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यातच पाटण तालुक्याच्या हद्दीत असणारे रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या फरशी पुलांचे काम बांधकाम विभागाने सुरू केले असून, त्यासाठी जागोजागी खोल खड्डे काढले आहेत. ‘येथे खोल खड्डा आहे,’ असे फलक त्याठिकाणी लावले असले तरी सर्वच फरशी पूल एकदम बांधायचे काम हाती घेतल्यामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या वाहनांना धोकादायक झाले आहे. कऱ्हाड-चिपळूण हा राज्य मार्ग चौपदरीकरण होणार अशी चिन्हे दिसू लागली असून, त्याची सुरुवात कऱ्हाड तालुक्यातील विजयनगर ते वारुंजी विमानतळ परिसरात दिसून येते. अगोदरच या रस्त्याच्या दुतर्फा जुनी झाडे असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यातच पाटण ते कोयनानगर दरम्यानचा रस्ता खड्ड्यात गेल्याने वाहतुकीस अयोग्य झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील सर्व फरशी पुलांचे नवीन बांधकाम सुरू केल्यामुळे जेसीबीच्या साह्याने मोठमोठ्या चरी काढून खोल खड्डे काढले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी भरधाव येणारी वाहने अशा धोकादायक खड्ड्यांचा बळी ठरण्याची शक्यता आहे. एकाच वेळी सर्व फरशी पुलांची कामे हाती घेण्याची गरज नव्हती ,अशी अपेक्षा वाहनधारक व्यक्त करत आहेत. (वार्ताहर)काम ठप्प...!कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावर फरशी पूल बांधण्यासाठी खड्डे काढून ठेवले आहेत. त्यावर बांधकाम करणारी यंत्रणा अत्यंत धिम्यागतीने काम करत आहे. काही ठिकाणी तर खड्डे काढून ठेवले आहेत, मात्र काम सुरू नाही.