शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ युवा महोत्सवात ‘गोगटे-जोगळेकर’चे सुयश

By admin | Updated: September 15, 2014 23:24 IST

रौप्य पदक प्राप्त : महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथम

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात वाङमय विभागांतर्गत गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाने दोन पारितोषिके पटकावली आहेत. महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच वादविवाद (बी ग्रुप- इंग्रजी भाषा) या स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झाले आहे.४७व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या अंतिम स्पर्धा सध्या विद्यापीठात विद्यार्थी भवन, चर्चगेट येथे सुरु आहेत. ‘चांगले दिवस आले आहेत’ या विषयावर इंग्रजीतून चांदनी जलील हुश्ये आणि दिलकश जलील हुश्ये या भगिनींनी आपले विचार मांडले आणि रौप्यपदकाची कमाई केली. याचबरोबर वादविवाद (ए ग्रुप-मराठी भाषा) स्पर्धेत मैत्रेयी श्रीकांत बांदेकर (प्रथम वर्ष विज्ञान) आणि मेघना अशोक बेहेरे (प्रथम वर्ष वाणिय) या विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. अक्षर परमानंद पिलणकर या विद्यार्थ्याने मूर्तिकाम (क्ले मॉडेलिंग) स्पर्धेत ‘नाती’ या विषयासाठी रौप्यपदक प्राप्त केले.मुंबई विद्यापीठासोबतच अन्य स्पर्धांमध्ये वाङमय मंडळाच्या विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे. कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती वक्तृत्त्व स्पर्धेत आणि ज्ञानसाधना वरिष्ठ महाविद्यालय, ठाणे आयोजित कै. ग. का फणसे कोकण विभागीय वक्तृत्त्व स्पर्धेत शुभम जनार्दन जाधव या व्दितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्याने अनुक्रमे तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.या स्पर्धांकरिता प्राचार्य डॉ. सुभाष देव, प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अतुल पित्रे यांचे प्रोत्साहन लाभले. प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. शिवराज गोपाळे, डॉ. यास्मिन आवटे, प्रा. मधुरा आठवले, प्रा. शिवाजी उकरंडे, प्रा. आनंद आंबेकर, प्रा. डी. आर. वालावलकर, प्रा. महेश नाईक, प्रा. श्रीवल्लभ साठे व मुस्सरत मुल्ला या माजी सहभागी विद्यार्थिनींचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन करण्यात आले. (प्रतिनिधी)महाविद्यालयाने मिळविलेले यश कौतुकास्पद.४७वा आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव.मराठी मंडळातर्फे घेतला गेला कार्यक्रम.अंतिम स्पर्धा विद्यापीठात सुरू, विद्यार्थ्यांनी मिळविले यश.