शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Festival-महाकालीची गौराई विराजमान होते मानाच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 14:12 IST

कोकण म्हटलं की, रूढी, परंपरा आल्याच. प्रत्येक सण, उत्सवात या रूढी, परंपरा आजही तेवढ्याच आत्मीयतेने जोपासल्या जात आहेत. राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्रीदेवी महाकालीची गौराई मंदिरात विराजमान न होता चक्क मानाच्या घरी विराजमान होते. येथील प्रभाकर गुरव यांच्या घरी पूर्वापार ही गौराई विराजमान होत असून, सुवासिनी उत्साहाने तिचे पूजन करतात.

ठळक मुद्देमहाकालीची गौराई विराजमान होते मानाच्या घरातसुवासिनी करतात पूजा

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : कोकण म्हटलं की, रूढी, परंपरा आल्याच. प्रत्येक सण, उत्सवात या रूढी, परंपरा आजही तेवढ्याच आत्मीयतेने जोपासल्या जात आहेत. राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्रीदेवी महाकालीची गौराई मंदिरात विराजमान न होता चक्क मानाच्या घरी विराजमान होते. येथील प्रभाकर गुरव यांच्या घरी पूर्वापार ही गौराई विराजमान होत असून, सुवासिनी उत्साहाने तिचे पूजन करतात.आडिवरे येथे राणे - गुरव यांची ३ कुटुंब आहेत. या कुटुंबांपैकी प्रभाकर गुरव यांचे मूळ घर मानले जाते. त्यामुळे देवीचे बहुतांशी मान या घराकडेच आहेत. प्रभाकर गुरव यांच्याकडे विराजमान होणारी गौराईदेवी मानाची असल्याचे सांगितले जाते. या गौराईचे पूजन व सजावट करण्याची जबाबदारी आजही हे कुटुंबीय पार पाडत आहेत.

गौराई आणण्यासाठी मंदिरातून सुवासिनी सायंकाळी ५ वाजता निघतात. मंदिरातील ढोल वाजवत सुवासिनी हळदीचे रोप व पूजेचे साहित्य घेऊन भगवती मंदिराजवळील वजरावर जातात. तेथे पूजन करून या सुवासिनी परत घरी येतात. यावेळी गावातील इतर महिलादेखील आपापल्या घरातील गौराई आणण्यासाठी जातात. ढोल वाजवणाऱ्याला दक्षिणा म्हणून पानाचा विडा दिला जातो.गौरी पूजनादिवशी प्रभाकर गुरव यांच्या घरी ठेवण्यात आलेला गौराईचा मुखवटा सजवला जातो. त्यानंतर तीनही कुटुंबातील सुवासिनींना ओवसासाठी सकाळी निमंत्रण दिले जाते. त्यानंतर दुपारी प्रत्येक घरातील सर्व सुवासिनी ओवसासाठी एकत्र येतात. ओवशासाठी असणाऱ्या सुपात देवीची पंचारती, मंडपीला लावण्यात आलेला नारळ घेऊन मंदिरात येतात. त्यानंतर सुवासिनी मंदिरातील देवतांसमोर ओवसे ठेवून पूजन करतात.सुवासिनी करतात पूजानवीन लग्न झालेली सुवासिनी मंदिरात आपला ओवसा मानविण्यासाठी येते. अन्य महिला मंदिरात येत नाहीत. मात्र, प्रभाकर गुरव यांच्या घरातील सुवासिनी दरवर्षी ओवसा घेऊन मंदिरात येतात आणि त्याचे पूजन करतात.खर्चही स्वत:चाचदेवीचा मुखवटा प्रभाकर गुरव यांच्याकडे ठेवलेला असतो. त्याची सर्व जबाबदारी त्यांच्याकडेच असते. मुखवटा सजवणे आणि त्यासाठी करण्यात येणारा सर्व खर्च ते स्वत:च करतात. ही प्रथा अनेक वर्षे सुरू आहे. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरी