शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

Dadaji Bhuse: शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे अन् खते द्या, कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 7:34 PM

या बैठकीत मंत्री भुसे यांनी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला.

दापोली : कोकणातील शेतकऱ्यांना गरजेनुसार गुणवत्तापूर्ण बियाणे आणि खते मिळेल याची खबरदारी घ्या असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज, शुक्रवारी कोकण विभाग खरीप हंगामा बैठकीत दिले. मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे विभागस्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीत मंत्री भुसे यांनी ठाणे, पालघर, रायगड,  रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला.बैठकीला विभागीय आयुक्त कोकण विभाग विलास पाटील, कृषी आयुक्त धिरज कुमार, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, जिल्हाधिकारी ठाणे, जिल्हाधिकारी रत्नागिरी डॉ. बी.एन.पाटील, जि.प. रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, संचालक विस्तार व प्रशिक्षण विकास पाटील, संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण दिलीप झेंडे, संचालक कृषी प्रक्रीया व नियोजन सुभाग नागरे, संचालक फलोत्पादन कैलास मोते आदि उपस्थित होते.कोकण विभागाचा एकूण 4.43 लाख हेक्टर खरीप क्षेत्र असून ठाणे जिल्हा 0.50 लाख हेक्टर, पालघर जिल्हा 1.03 लाख हेक्टर, रायगड जिल्हा 1.18 लाख हेक्टर, रत्नागिरी जिल्हा 0.92 लाख हेक्टर तर सिंधुदूर्ग जिल्हयाचे 0.69 लाख हेक्टर खरीप क्षेत्र आहे. सन 2022-23 साठी एकूण 89310 क्विंटल बियाणे मागणी प्रस्तावित असून ठाणे जिल्हयाची 17500 क्विंटल, पालघर जिल्हा 26700 क्विंटल, रायगड 22750 क्विंटल, रत्नागिरी जिल्हा 14735 क्विंटल तर सिंधुदूर्ग जिल्हयाची 7625 क्विंटल मागणी प्रस्तावित आहे.सन 2022-23 साठी कोकण विभागाचे खरीप पिक कर्ज एकूण लक्षांक 1159.83 कोटीचे आहे. ठाणे जिल्हा 139.78 कोटी, पालघर जिल्हा 157.40 कोटी, रायगड जिल्हा 278.05 कोटी, रत्नागिरी जिल्हा 284.60 कोटी, सिंधुदूर्ग जिल्हा 300 कोटीचे खरीप पिक कर्ज उद्दीष्ट आहे.कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सन 2022-23 मध्ये राबविण्यात येणाऱ्या भात बियाण्याची उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया मोहिम, लागवड पध्दतीचा प्रसार, बांधावर तुर लागवड, शेतीशाळा, 10 टक्के रासायनिक खतांची बचत, यांत्रिकी पध्दतीने भात लागवड व ड्रोन द्वारे फवारणी, जुन्या आंबा बागांचे पुर्नजीवन, आंब्याची उत्पादकता वाढविणे, आंबा मोहोर संरक्षण प्रशिक्षण, काजु - जुन्या बागांचे व्यवस्थापन, काजुची उत्पादकता वाढविणे, हॉर्टिनेट, मॅगोनेट, व्हेजनेट शेतकरी नोंदणी वाढ करणे, फळबाग लागवड- मग्रारोहयो क्षेत्र विस्तार आदी विषयांवर चर्चा केली, आढावा घेतला व सूचना केल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी