सुधारित जातींचा वापर करून अधिक उत्पन्न घ्यावे : संजय सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:19+5:302021-07-02T04:22:19+5:30

दापोली : विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध भातांच्या सुधारित जातींचा वापर आणि विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान यांची सांगड घालून कोकणातील ...

Get more income by using improved varieties: Sanjay Sawant | सुधारित जातींचा वापर करून अधिक उत्पन्न घ्यावे : संजय सावंत

सुधारित जातींचा वापर करून अधिक उत्पन्न घ्यावे : संजय सावंत

दापोली : विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध भातांच्या सुधारित जातींचा वापर आणि विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान यांची सांगड घालून कोकणातील भात पिकाची उत्पादकता वाढविणे सहज शक्य असल्याचे मत काेकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी व्यक्त केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जिल्हा परिषद कृषी विभाग रत्नागिरी व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत खरीप हंगामातील भातपीक लागवड या ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाइन परिसंवादाचे उद्घाटक कुलगुरू डाॅ. संजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसंवाद पार पडला.

विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी भात पीक हे कोकणच्या शेतीतील अविभाज्य घटक असून, लाल भातासारखं वाण लागवडीखाली आणण्याची गरज असल्याचे सांगितले. विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत वेबिनार मालिका सुरू केली आहे. या मालिकेतील पहिला वेबिनार भात लागवडीच्या विविध पद्धती, पुनर्लावणी व रोप प्रक्रिया या विषयावर कृषी विद्या विभागाच्या प्रमुख डॉ. प्रशांत बोडके यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने पार पडला. ऑनलाइन परिसंवादाला विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉ. संजय भावे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने, कृषी व पशुसंवर्धन सभापती रेश्मा झगडे, अजय शेंडे व जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. वेबिनार मालिकेचे प्रास्ताविक अजय शेंडे, तर सूत्रसंचालन डॉ. संतोष वरवडेकर यांनी केले.

Web Title: Get more income by using improved varieties: Sanjay Sawant