शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
3
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
4
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
5
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
6
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
7
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
8
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
9
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
10
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
11
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
12
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
13
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
14
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
15
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
16
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
18
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
19
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
20
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

पटसंख्येअभावी भवितव्य अधांतरी

By admin | Updated: May 11, 2015 23:28 IST

राजापूर तालुका : ६८ शाळांना बसणार शासन निर्णयाचा फटका

राजापूर : केंद्र शासनाच्या सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा कमी पटसंख्येमुळे अबोल होण्याच्या मार्गावर आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी शासनाला केलेल्या शिफारशींमध्ये दहा किंंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याबाबत सुचवल्याने राजापूर तालुक्यातील सुमारे ६८ शाळांचे व त्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या दिवसागणिक घटत असून, दुसरीकडे नवीन शाळा व तुकड्यांना मंजुरी मिळावी, अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने याबाबत पूर्ण अभ्यास करुन आपला अहवाल राज्य शासनाला नुकताच सादर केला आहे. त्या अहवालामध्ये केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९प्रमाणे प्राथमिक शाळांमध्ये १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. भविष्यात त्याची अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील ४७४ प्राथमिक शाळांना कायमचे टाळे लागणार असून, राजापूर तालुक्यातील ६८ शाळांचा त्यामध्ये समावेश आहे.केंद्र शासनाने देशभर सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षणासाठी करोडो रुपयांचे अनुदान खर्च केले असून, त्या माध्यमातून शाळांच्या वर्गखोल्या सुसज्ज बांधण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत दिवसेंदिवस प्राथमिक शाळांची पटसंख्या घसरत असून, आता भौतिक सुविधांसह सुसज्ज इमारती आहेत , शिकवणारे शिक्षकही आहेत पण त्या इमारतीमध्ये शिकणारे विद्यार्थीच नाहीत, अशी प्राथमिक शिक्षणाची अवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या रुसव्याने शाळाच अबोल होण्याच्या मार्गावर आहेत.घसरत्या पटसंख्येमुळे १०पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याची शिफारस शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना करावी लागली. राजापूर तालुक्यातील मराठी ६० व उर्दु माध्यमाच्या ८ अशा ६८ शाळांमध्ये कमी पट आहे. त्यामध्ये अणसुरे नं. १, हुर्से, निवेली, साखरकोंबे, साखर मिरगुले पाखाडी, साखर आंबेरकोणी, भालावली नं. ६, देवीहसोळ नं. ३, कोतापूर नं. ४, देवाचेगोठणे अंबरवाडी, केळंबेकरवाडी, विखारेगोठणे नं. २ गोठणे दोनिवडे नं. ४, ५, ६, हातदे नं. २, मूर नं. ४, दोनिवडे गवळवाडी नं. २, हातिवले २, कोंड्ये ४ तांबळवाडी, पांगरीखुर्द २, येरडव २, झर्ये २, केळवली नं. ५, ६, ७, धोपेश्वर तिथवली धनगरवाडी, जैतापूर आगर, होळी, जुवे जैतापूर, भंडारसाखरी, मिठगवाणे २, ३, धाऊलवल्ली ४, ६, नाटे पडवणे, कोळवणखडी २, ओझर धनगरवाडी, पाचल नं. ४, विल्ये ३, ४, शीळ ३, फुफेरे लिगमवाडी ३, २, शेंबवणे २ वरचीवाडी, आडवली २, सौंदळ ठिकाणकोंड, बांधिवडे, मोसम ३, बारसू २, गोवळ १, ससाळे २ जोगलेवाडी, तळगाव ३, ताम्हाणे धनगरवाडी ६, तारळ लागवणवाडी ४, वडदहसोळ ५, ६, पानेरे, रुंढेतळी, तिवरे आडिवरे अशा साठ मराठी शाळा, तर उर्दु माध्यमाच्या कोंढेतड, रानतळे, बागकाझी मोहल्ला, ओझर, पन्हळे, गोठणे सोगमवाडी, तळगाव व दसूर या शाळांचा समावेश आहे.गेल्या वर्षी मराठी माध्यमाच्या ६८ शाळांमध्ये ३९०, तर उर्दु माध्यमाच्या ८ शाळांमध्ये ४४ विद्यार्थी शिक्षण घेत होते. या ६८ शाळा बंद झाल्यास त्यातील एकूण ११५ वर्गखोल्या विद्यार्थ्यांअभावी ओस पडणार आहेत. यापूर्वी या शाळांवर शासनाने करोडो रुपये खर्च केले असून, या बंद वर्गखोल्यांचे भविष्यात शासन काय करणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)