Ratnagiri: दापोलीत झटापटीत मित्राचा खून, दारुच्या नशेत घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 12:11 IST2024-05-20T12:11:22+5:302024-05-20T12:11:37+5:30
दापोली : किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या झटापटीत एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना दापाेली तालुक्यातील काेळथरे माेहल्ला येथे शनिवारी सकाळी ...

Ratnagiri: दापोलीत झटापटीत मित्राचा खून, दारुच्या नशेत घडला प्रकार
दापोली : किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या झटापटीत एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना दापाेली तालुक्यातील काेळथरे माेहल्ला येथे शनिवारी सकाळी घडली. विशाल शशिकांत मयेकर (३९, रा.पंचनदी निमुर्डेवाडी, दापाेली) यांचा मृत्यू झाला असून, पाेलिसांनी शशिभूषण शांताराम सनसुळकर (४७, रा.काेळथरे, दापाेली) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. या खुनाचे खरे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
या खूनप्रकरणी रिक्षा चालक अमित शशिकांत मयेकर (४२) यांनी फिर्याद दिली आहे. विशाल शशिकांत मयेकर हे त्यांचा मित्र शशिभूषण शांताराम सनसुळकर व मनोज प्रभाकर आरेकर यांच्यासोबत मोलमजुरी करण्याचे काम करीत होता. ते अनेकदा मित्रांसोबत दारू पिण्यासही बसत असत. त्यावेळी शशिभूषण सनकुळकर हा कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून होत असलेल्या वादातूनच दारूच्या नशेत एकमेकांना धक्काबुक्की करून मारहाण करीत.
विशाल मयेकर व शशिभूषण सनकुळकर हे दोघे शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान कोळथरे मोहल्ला येथे गेले होते. यावेळी अज्ञात कारणावरून दाेघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत शशिभूषण याने विशाल मयेकर यांना कोणत्यातरी अवजड वस्तूने किंवा हत्याराने मारले. हा वार वर्मी लागल्याने त्यामध्ये माेठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन विशाल मयेकर यांचा मृत्यू झाला.
या खूनप्रकरणी दाभाेळ पाेलिस स्थानकात शशिकांत सनकुळक याच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पाेलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही. दरम्यान, हा खून नेमक्या काेणत्या कारणातून झाला, याचा शाेध दाभाेळ पाेलिस घेत आहेत.