शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच हजार प्रस्ताव निकाली

By admin | Updated: July 16, 2015 22:55 IST

प्रमोद जाधव : जातपडताळणी प्रमाणपत्र वितरणात सुसुत्रता

रत्नागिरी : रत्नागिरी येथील विभागीय जातपडताळणी कार्यालयाकडून जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणात आता सुसूत्रता येत असून, येथील कारभार गतिमान झाला आहे. जानेवारी ते जून २०१५ या सहा महिन्यांमध्ये ५ हजार ७२८ प्रस्ताव निकाली काढण्यात आल्याची माहिती समाजकल्याण उपायुक्त प्रमोद जाधव यांनी दिली. रत्नागिरीतील कुवारबाव येथे विभागीय जात पडताळणी कार्यालय सुरु करण्यात आले. कार्यालय सुरु होऊनही रिक्त पदांमुळे दाखल होणाऱ्या प्रस्तावांचा निपटारा होण्यात अडचण निर्माण होत आहे. विद्यार्थी, शासकीय कर्मचारी व लोकप्रतिनिधींचे प्रस्ताव प्रलंबित होते. येथील कारभारामध्ये सुसूत्रता नसल्याने जात पडताळणी वेळेवर होण्याचे प्रमाणही नगण्य होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून येथील कारभाराला गती येण्यासाठी जात पडताळणी समिती स्तरावर प्रयत्न करण्यात आला. या कार्यालयाचा कारभार गतिमान होऊन प्रमाणपपत्रांचे वितरणही सुरळीत होण्यास मदत झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. या कार्यालयाने जानेवारी ते डिसेंबर २०१४ या वर्षभरामध्ये तब्बल २१ हजार ९७९ प्रकरणे मार्गी काढून प्रलंबित प्रकरणे कमी केली आहे. जानेवारी ते जून २०१५ या ६ महिन्यामध्ये ५ हजार ७२८ प्रस्तावांची छाननी पूर्ण करुन प्रस्ताव निकाली काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. अजूनही ४ हजार ४३१ प्रस्ताव छाननी स्तरावर प्रलंबित असल्याचे जाधव यांनी सांगितले.दरम्यान गेल्या सहा महिन्यात जातपडताळणी कार्यालयाने कारभारात सुसुत्रता आणतानाच वेगाने काम सुरु केल्याने प्रमाणपत्रांची प्रकरणे निकाली काढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय व करावी लागणारी प्रतिक्षा आता दूर होणार आहे. (वार्ताहर)जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत अनेक वर्षाचे प्रलंबित २१९७९ प्रस्ताव निकाली काढण्यात आले. जानेवारी ते जून २०१५ या ६ महिन्यांत ५७२८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.