रत्नागिरी: पाचांबे नेरदवाडीत जनावरांच्या गोठ्याला भीषण आग, १३ म्हैशींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 11:35 IST2022-07-09T11:35:10+5:302022-07-09T11:35:51+5:30

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

Fire breaks out at Pachanbe Neradwadi ratnagiri district, 13 buffaloes die | रत्नागिरी: पाचांबे नेरदवाडीत जनावरांच्या गोठ्याला भीषण आग, १३ म्हैशींचा मृत्यू

रत्नागिरी: पाचांबे नेरदवाडीत जनावरांच्या गोठ्याला भीषण आग, १३ म्हैशींचा मृत्यू

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे नेरदवाडीतील संजय जाधव यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागून आगीत गोठा भस्मसात झाला आहे. ही आग मध्यरात्री लागली असून गोठ्यातील १३ म्हैशी देखील जळाल्या. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पाचांबे नेरदवाडी संजय जाधव यांच्या गुरांच्या गोठ्याला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत गोठा जळून भस्मसात झाला. यात १३ म्हैशींचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच गोठ्याचे तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश संगमेश्वर चे तहसीलदार सुहास थोरात यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना दिले आहेत.

Web Title: Fire breaks out at Pachanbe Neradwadi ratnagiri district, 13 buffaloes die