फिनोलेक्स ॲकॅडमीला ‘उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:18+5:302021-07-02T04:22:18+5:30

रत्नागिरी : झी न्यूज डॉट कॉम आणि इंडिया डॉट कॉम यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘झी डिजिटल एज्युफ्युचर एक्सलन्स ...

Finolex Academy Award for Outstanding Engineering College | फिनोलेक्स ॲकॅडमीला ‘उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय’ पुरस्कार

फिनोलेक्स ॲकॅडमीला ‘उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय’ पुरस्कार

रत्नागिरी : झी न्यूज डॉट कॉम आणि इंडिया डॉट कॉम यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘झी डिजिटल एज्युफ्युचर एक्सलन्स अवॉर्ड्स २०२१’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात रत्नागिरीतील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय (पश्चिम ) विभाग २०२१’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांना प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारासाठी तज्ज्ञ सदस्य, ऑनलाईन सर्वेक्षण आणि एड्स्टार्ट सोल्युशन्स यांच्यामार्फत मूल्यांकन केले गेले. अंतिम कार्यक्रमात शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांचे उद्घाटन भाषण आणि एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांच्यासमवेत फायरसाईड चॅट यांचा समावेश होता. मुख्यत्वे नऊ मापदंडानुसार महाविद्यालयाचे मूल्यांकन केले गेले. त्यामध्ये महाविद्यालयाची माहिती, विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा, महाविद्यालयाने आयोजित केलेले करिअर कम्युनिकेशन प्रोग्राम, महाविद्यालयातील प्लेसमेंट, महाविद्यालयाने मिळवलेले यश व पुरस्कार, ग्लोबल एक्सपोजर, उद्योजकता विकास, नाविन्यपूर्ण संशोधन आणि उद्योग जगताशी महाविद्यालयाचे नाते यासारख्या मूलभूत बाबी लक्षात घेऊन मूल्यमापन करण्यात आले. या यशाबद्दल फिनोलेक्स ॲकॅडमीच्या अध्यक्ष अरुणा कटारा व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Finolex Academy Award for Outstanding Engineering College