अखेर गोवळकोट-मिरज बस सेवा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST2021-09-26T04:34:24+5:302021-09-26T04:34:24+5:30

चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण, खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था आणि चिपळूणचा महापूर याविरोधात न्यायालयीन लढा उभारणारे ...

Finally Govalkot-Miraj bus service started | अखेर गोवळकोट-मिरज बस सेवा सुरु

अखेर गोवळकोट-मिरज बस सेवा सुरु

चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण, खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था आणि चिपळूणचा महापूर याविरोधात न्यायालयीन लढा उभारणारे चिपळूणचे सुपुत्र ॲड. ओवेस पेचकर यांच्या मागणीनुसार येथील आगारातर्फे शहरातील गोवळकोट धक्का ते मिरज अशी नवीन एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. त्याप्रमाणे शनिवारी पहाटे ५.३० वाजता या मार्गावर पहिली बस धावली.

तालुक्यातील कालुस्ते, गोवळकोट, गोवळकोट रोड परिसरातील नागरिकांना या बससेवेचा फायदा होणार आहे. गेली कित्येक महिने नागरिकांमधून ही बससेवा सुरू व्हावी, अशी मागणी होत होती. या परिसरातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी ॲड. ओवेस पेचकर यांनी लक्ष घालत पुढाकार घेतला. चिपळूण आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांची आपल्या सहकाऱ्यांसह भेट घेऊन त्यांनी गोवळकोट धक्का ते मिरज, अशी एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच त्यासंदर्भात पाठपुरावाही केला. या प्रयत्नांना अखेर यश आले असून चिपळूण आगारातून शनिवारी पहाटे या नवीन बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. ही बससेवा सुरू हाेताच शुक्रवारी आगार व्यवस्थापक राजेशिर्के यांची भेट घेऊन ओवेस पेचकर यांनी आभार मानले. यावेळी चिपळूण आगारातील अधिकारी, कर्मचारी तसेच सहकारी उपस्थित होते.

Web Title: Finally Govalkot-Miraj bus service started