शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या आरक्षणासाठीचा लढा सुरूच राहणार : प्रसाद लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST

राजापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात योग्य प्रकारे बाजू न मांडल्याने मराठा आरक्षण रद्द झाले ...

राजापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात योग्य प्रकारे बाजू न मांडल्याने मराठा आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे आज मराठा समाज बांधवांमध्ये तीव्र संताप आहे. मराठा समाज बांधव म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हा आमच्या हक्काच्या आरक्षणासाठीचा लढा सुरूच राहणार आहे. त्यामुळे आता तरी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने योग्य प्रकारे बाजू मांडावी, असे आवाहन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आमदार लाड यांनी राजापुरात मराठा समाज बांधवांशी संवाद साधला. हॉटेल गुरूमाऊली येथील सभागृहात झालेल्या या छोटेखानी बैठकीप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, मराठा समाज सेवा संघ, राजापूरच्या महिला पदाधिकारी धनश्री मोरे उपस्थित होते.

यावेळी आमदार लाड यांनी मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकवण्यासाठी घेण्यात आलेल्या सकारात्मक भूमिकेबाबत माहिती दिली. मात्र, उच्च न्यायालयात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने योग्य प्रकारे व भक्कमपणे बाजू न मांडल्याने आरक्षण रद्द झाले. त्याचा फटका मराठा समाजाला बसला आहे. आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये तीव्र संताप आहे. युवक, युवतींमध्ये नैराश्य आहे. हे लक्षात घेऊन आज मराठा समाज बांधवांनी संघटीतपणे एकत्र येऊन यासाठी पुन्हा एकदा नव्या जोमाने लढा दिला पाहिजे, असे लाड यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करेपर्यंत मराठा समाजातील ज्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यांना सरकारी नोकरीत तातडीने नियुक्ती द्यावी, सारथी, आण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी द्यावा, ही आमची मागणी असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले. यावेळी धनश्री मोरे, विनायक कदम यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक व आभार अ‍ॅड. सुशांत पवार यांनी मानले.

या बैठकीला भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, मराठा समाज सेवा संघाचे विनायक सावंत, संजय ओगले, नरेंद्र मोहिते, महेश विचारे, प्रकाश ढवळे, दीपक नाटेकर, सुहास शिंदे, दिलीप पवार, जितेंद्र विचारे, अशोक कदम यांच्यासह मराठा समाज सेवा संघाचे पदाधिकारी, मराठा बांधव व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

-----------------------

राजापूर येथे मराठा समाज बांधवांच्या बैठकीत आमदार प्रसाद लाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अ‍ॅड. दीपक पटवर्धन, अभिजीत गुरव, धनश्री मोरे उपस्थित हाेते.