शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विस्तार अधिकाऱ्याचा शिक्षकावर हल्ला

By admin | Updated: March 28, 2015 00:00 IST

संतापजनक प्रकार : दापोली तालुक्यातील कादिवलीतील घटना

दापोली : तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे यांनी कादिवली शाळेतील शिक्षक सुशीलकुमार पावरा यांना सुरीने वार केले. त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली, अशी तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल झाली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.कादिवली शाळेत उपशिक्षक असणारे सुशील पावरा यांनी आपली काही महत्त्वाची कागदपत्रे शिक्षण विभागाकडून गहाळ झाल्याची तक्रार केली होती. ती परत मिळण्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकारात मागणी केली होती. मात्र, तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी नंदलाल शिंदे यांनी वेळीच माहिती दिली नाही. त्यामुळे पावरा यांनी शिंदे यांची तक्रार वरिष्ठांकडे दिली. त्या रागातून शिंदे यांनी पावरा यांना यापूर्वी धमकी व दमदाटी केली होती. त्यामुळे हताश होऊन माहिती मिळवण्यासाठी पावरा यांनी आयुक्तांकडे अपील केले होते. त्याचा निकाल आपल्या बाजूने लागल्याचे पावरा यांचे म्हणणे आहे.
हा राग मनात धरून शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास शिक्षण विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे शाळेत आले. त्यावेळी आपण मुलांना शिकवित होतो. ते वर्गात येऊन आपल्याशी वाद घालत आरडाओरड सुरू केला. हा प्रकार पाहून मुले घाबरून गेली. काही मुले हा प्रकार पाहून रडायला लागली. आपल्याला गेटआऊट म्हणत धारदार सुरी घेऊन ते आपल्या अंगावर धावून आले. बचावासाठी आपण सुरीचा धारेचा भाग हातात धरला असता शिंदे यांनी सुरी ओढली. त्यामुळे आपल्या हाताच्या बोटाला जखम झाली असल्याचे पावरा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
घटनेनंतर काही वेळातच शाळेच्या तपासणीकरिता विस्तार अधिकारी शिंदे यांच्यासह केंद्रप्रमुख शीतल गिम्हवणेकर, शिरसाट, मुख्याध्यापक खांबल त्या वर्गात आले. हा प्रकार पाहिल्यावर त्यांनी आपल्याला उपचाराकरिता रुग्णवाहिकाद्वारे उपजिल्हा रुग्णालयात पाठवले, असेही त्यांनी म्हटले आहे.
दापोली पंचायत समिती शिक्षण विभागात पावरा व शिंदे यांचा वाद गेली दोन वर्षे सुरू आहे. शिंदे पदाचा वापर करून पावरा यांना वारंवार त्रास देत असल्याच्या घटना गेली दोन वर्षे घडत आहेत. पावरा यांना जाणून बुजून त्रास देण्यात येत असून, आजसुद्धा मनात राग धरूनच ते गेले होते. याबाबत दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल वीरेंद्र घाणेकर करीत आहेत. (प्रतिनिधी)

आपण यापूर्वी नंदलाल शिंदे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच माहिती अधिकारात त्यांच्याकडे माहिती मागितली असता ती न दिल्याने आयुक्तांकडे अपील केले होते. एका महिन्यात जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांनी या संदर्भात चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. याचा राग मनात धरून आपल्याला त्रास देण्याच्या हेतूने त्यांनी हत्याराने मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे पावरा यांनी तक्रारीत म्हटले आहे.