शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

एस्. टी. कामगार संघटनेचे आंदोलन

By admin | Updated: October 15, 2016 23:22 IST

रत्नागिरीत धरणे : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाची मागणी

रत्नागिरी : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन निश्चिती करून सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीबरोबरच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एस्. टी. कामगार संघटनेतर्फे माळनाका येथील विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बहुसंख्य एस्. टी. कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये विभागातील अनेक रात्रवस्तीच्या ठिकाणी चालक-वाहकांना प्रात:विधीसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना अडचणीचे ठरत आहे. भारत सरकारतर्फे ग्रामस्वच्छता कार्यक्रम राबविला जात आहे. मात्र, अनेक गावांमध्ये प्रात:विधीची सुविधा उपलब्ध नसल्याने रात्रवस्तीच्या कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव उघड्यावर हे विधी उरकावे लागतात. यामुळे विभागातील चालक-वाहकांमध्ये अपराधीपणाची भावना पसरली आहे. तसेच विभागातील सर्वच आगारांमध्ये बसेसना रिमोल्ड टायर बसविण्यात येत असल्याने गंभीर स्वरूपाच्या अपघाताची शक्यता आहे. व्हेईकल टूल्सच्या कमतरतेमुळे सर्वच आगारातील चालकांना त्रास सहन करावा लागत असून, नादुरुस्त क गाड्यांमुळे प्रवासी उत्पन्नही घटत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. यावेळी विभागीय अध्यक्ष राजू मयेकर, सचिव रवी लवेकर, खजिनदार संदीप भोंगले, कार्याध्यक्ष दत्ताराम घडशी तसेच नऊ आगारांमधील संघटनेचे अध्यक्ष, खजिनदार, सचिव, तसेच सदस्य बहुसंख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)