शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलिविरुद्ध अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
6
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
7
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
8
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
9
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
10
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
11
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
12
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
13
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
14
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
15
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
16
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
17
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
18
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
19
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
20
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!

Ratnagiri: दापोलीत उपोषणकर्त्याला मारहाण, अभियांत्रिकी सहायकाचे कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:46 IST

तक्रारीनंतर रत्नागिरीला बदली

दापोली (जि. रत्नागिरी) : आपल्या विरोधात उपोषण केले म्हणून एका अधिकाऱ्याने उपोषणकर्त्याला कार्यालयातच मारहाण केल्याचा प्रकार दापोलीमध्ये घडला आहे. हा अधिकारी मद्यपान करूनच कार्यालयात आले असल्याची तक्रार या उपोषणकर्त्याने पोलिसांकडे केली आहे.दापोली येथील मयूर मोहिते हे माहिती अधिकार कार्यकर्ते २६ जानेवारी रोजी पत्तन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात दापोली येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. त्यांनी या कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक राकेश रमेश जाधव यांची बदली करावी व त्यांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार अधीक्षक अभियंता यांनी राकेश जाधव यांची रत्नागिरी येथील कार्यालयात तात्पुरती बदलीही केली होती.शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मयूर मोहिते हे पत्तन विभागाच्या कार्यालयात कागदपत्र घेण्यासाठी गेले होते. तेथून ते बाहेर पडत असताना राकेश जाधव तेथे आले. त्यांनी मोहिते यांना शिवीगाळ केली. कमरेत लाथ मारली. डोक्यावरही मारले. मात्र, मोहिते यांच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने ते बचावले. त्यानंतर तेथे उपस्थित असलेले अभियंता दिनेश पंडित व अमोल कांबळे यांनी राकेश जाधव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही ते आवरत नव्हते. मयूर मोहिते हे तक्रार देण्यास पोलिस स्थानकात गेल्यावर राकेश जाधव कार्यालयातून निघून गेले.

तक्रार दाखलमयूर मोहिते यांनी राकेश जाधव यांच्याविरोधात दापोली पोलिस स्थानकात मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. जाधव यांच्या तोंडाला मद्याचा वास येत असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. जाधव यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीCrime Newsगुन्हेगारी