शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी निर्यात रोडावल्यामुळे राज्याअंतर्गत विक्रीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आंबा उत्पादन कमी असताना, परदेशातून आंब्याला चांगली मागणी होती, मात्र कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आंबा उत्पादन कमी असताना, परदेशातून आंब्याला चांगली मागणी होती, मात्र कोरोनामुळे विमानवाहतूक सेवा दि. ३१ मेपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे निर्यात ठप्प झाली आहे. वाशी येथील आंब्याचे दर गडगडले असून, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पणन मंडळातर्फे राज्यांतर्गत विक्रीवर भर देण्यात आला आहे. पुणे, मुंबई, नाशिक येथे शेतकऱ्यांच्या १५० आंबा पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

आंबा उत्पादन कमी असतानाच, निर्यातीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांकडील दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू असून, उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होत आहे. परदेशातून आंब्याला चांगली मागणी चांगली होती. रत्नागिरीतील पणन मंडळातर्फे सद्गुरू एंटरप्रायझेसच्या माध्यमातून कॅनडासाठी ४५० डझन, लंडनसाठी ७८८ डझन, तर कतारसाठी ४२६ डझन आंबा निर्यात करण्यात आला आहे. परदेशासह दिल्लीतील विक्रीवर विशेष भर देण्यात आला होता. दिल्लीत एकूण सात हजार २०० डझन आंबा पाठविण्यात आला.

पणन विभागाच्या माध्यमातून सदगुरू एंटरप्रायजेसतर्फे शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात येऊन रत्नागिरीतून थेट आंबा निर्यात करण्यात येत होता. विमान सेवाच बंद झाल्यामुळे निर्यात बंद झाली आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुंबई, पुणे, नाशिक येथील ग्राहकांशी संपर्क साधून शेतकऱ्यांचा आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. ५०० ते ६०० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्येही दर कोसळले असल्यामुळे राज्यांतर्गत विक्री परवडत आहे. शेतकऱ्यांना हमाली, वाहतूक खर्च जाऊन दर परवडत नसल्यामुळे एपीएमसीपेक्षा जाग्यावरील विक्री शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

................................

स्थानिक शेतकऱ्यांना जाग्यावरच चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी अपेडाच्या मान्यतेने सदगुरू एंटरप्रायझेसतर्फे जगातील विविध देशांपर्यंत आंबा विक्री करताना थेट निर्यातीवर भर देण्यात आला होता. मात्र विमानसेवाच बंद असल्यामुळे निर्यातही ठप्प आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यांतर्गत आंबा विक्रीसाठी सद्गुरू एंटरप्रायझेस प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ग्राहकांशी संपर्क साधण्यात येत आहे.

- प्रांजली प्रशांत नारकर, संचालिका, सदगुरू एंटरप्रायझेस