गणेशोत्सव काळात खाद्यपदार्थातील भेसळ टाळण्यासाठी काटेकोर तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST2021-09-02T05:08:11+5:302021-09-02T05:08:11+5:30

रत्नागिरी : गणेशोत्सव काळात मेवा तसेच इतर मिठाई पदार्थातून भेसळ टाळण्यासाठी काटेकोर तपासणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. ...

During Ganeshotsav, strictly inspect food to prevent adulteration | गणेशोत्सव काळात खाद्यपदार्थातील भेसळ टाळण्यासाठी काटेकोर तपासणी करा

गणेशोत्सव काळात खाद्यपदार्थातील भेसळ टाळण्यासाठी काटेकोर तपासणी करा

रत्नागिरी : गणेशोत्सव काळात मेवा तसेच इतर मिठाई पदार्थातून भेसळ टाळण्यासाठी काटेकोर तपासणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित नियंत्रण कक्ष समिती आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ जिल्हास्तरीय समिती, दूध भेसळीला आळा घालण्यासाठीची जिल्हास्तरीय समिती व केंद्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची बजावणी याचा आढावा घेण्यासाठी नियंत्रण कक्ष समिती आढावा बैठक जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) राजश्री मोरे, सहायक आयुक्त (अन्न ) सं.भा.नारागुडे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, अन्न सुरक्षा अधिकारी विजय पाचपुते, पाटणकर आदी उपस्थित होते.

सहायक आयुक्त नारागुडे यांनी यावेळी कार्यालयाकडून राबविण्यात आलेल्या तपासणीसत्र तसेच आदी कार्यवाहीबाबतची यावेळी माहिती दिली.

शाळांमध्ये ईट-टाईड फूड कॅम्पियन राबवा, तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास प्रतिबंधित असलेल्या ठिकाणी ड्राइव्ह घ्या, भेसळ टाळण्यासाठी हॉटेल्स आदी ठिकाणी स्पॉट तपासणी करा आदी सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिल्या.

Web Title: During Ganeshotsav, strictly inspect food to prevent adulteration