शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

थंडीअभावी अजूनही पालवीचे प्रमाण सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:21 IST

Mango, Winter Session Maharashtra, ratnagirinews डिसेंबर सुरू झाला तरी अद्याप थंडी गायब आहे. शिवाय मतलई वारही वाहात नसल्याने थंडीसाठी पोषक वातावरण नाही. जिल्ह्यात ९५ टक्के झाडांना पालवी आली आहे. मात्र, समुद्र किनारपट्टीलगत काही झाडांना दोन ते पाच टक्के मोहोर सुरू झाला आहे. हवामानातील बदलामुळे पालवीवर मोठ्या प्रमाणावर तुडतुडा असल्याने तो नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे.

ठळक मुद्देथंडीअभावी अजूनही पालवीचे प्रमाण सर्वाधिक

रत्नागिरी : डिसेंबर सुरू झाला तरी अद्याप थंडी गायब आहे. शिवाय मतलई वारही वाहात नसल्याने थंडीसाठी पोषक वातावरण नाही. जिल्ह्यात ९५ टक्के झाडांना पालवी आली आहे. मात्र, समुद्र किनारपट्टीलगत काही झाडांना दोन ते पाच टक्के मोहोर सुरू झाला आहे. हवामानातील बदलामुळे पालवीवर मोठ्या प्रमाणावर तुडतुडा असल्याने तो नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे.अद्यापही ऑक्टोबर हिटप्रमाणे उष्मा जाणवत असून पाहिजे त्या प्रमाणात थंडी सुरू झालेली नाही. सर्वत्र पालवीचे प्रमाण अधिक आहे. पालवी जून होण्यास सव्वा ते दीड महिन्याचा अवधी लागत असल्याने मोहोर प्रक्रियेस उशीर होण्याची शक्यता आहे.

पालवीवर तुडतुड्याचा प्रादुर्भाव असल्याने कीटकनाशकांची फवारणीही वेळोवेळी करावी लागत आहे. काही ठिकाणी झाडांना किरकोळ मोहोर आला असून, तो जपण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागत आहे. अद्याप ३० ते ३२ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. आंब्याला मोहोर येण्यासाठी २६ ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता आहे.जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये थंडीचे प्रमाण प्रचंड असते. त्यामुळे नीचांकी तापमानात येणाऱ्या मोहोराला फळधारणा अत्यल्प होते, त्याचवेळी पुनर्मोहोराचा धोका असल्याने एकूणच लहरी हवामानामुळे शेतकरी आतापासूनच धास्तावले आहेत.

पालवी सर्वाधिक असल्याने आंबा हंगाम लांबणार आहे, यात शंका नाही. मात्र, गतवर्षी फळधारणा न झालेल्या झाडांना मोहोर आला असून, त्याचे प्रमाण २ ते ५ टक्के इतकेच आहे. पालवीवर तुडतुडा मोठ्या प्रमाणावर असल्याने पालवीबरोबर मोहोर जपणे गरजेचे आहे.- राजन कदम, बागायतदार

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन