रत्नागिरीतील अंमली पदार्थ तस्कर होणार हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:29 IST2025-04-03T15:28:59+5:302025-04-03T15:29:15+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रीबाबत सतर्क झालेल्या पोलिसांनी आतापर्यंत रत्नागिरीतील चारजणांना हद्दपार केले आहे. याशिवाय अन्य १३ जणांच्या ...

Drug smugglers from Ratnagiri will be deported | रत्नागिरीतील अंमली पदार्थ तस्कर होणार हद्दपार

रत्नागिरीतील अंमली पदार्थ तस्कर होणार हद्दपार

रत्नागिरी : जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रीबाबत सतर्क झालेल्या पोलिसांनी आतापर्यंत रत्नागिरीतील चारजणांना हद्दपार केले आहे. याशिवाय अन्य १३ जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनीही नुकत्याच एका बैठकीत पोलिसांना आणि महसूल विभागाला कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

वर्षभरापूर्वी पोलिसांनी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्री विरोधात कारवाईचे सत्र सुरू केले होते. चिपळूण येथील एक प्रकार उघड झाल्यानंतर अनेकांवर कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर कारवाई थंडावली होती.

आता पुन्हा कारवाईचे सत्र सुरू केले जाणार आहे. जिल्हा पोलिस विभागाने नुकतेच सर्फराज उर्फ बॉक्सर अहमद शहा (३२, रा. गवळीवाडा, रत्नागिरी), सलमान नाझीम पावसकर (३५, रा. राजीवडा बांध,रत्नागिरी), फैझल मकसूद म्हसकर (३०, रा. कर्ला, रत्नागिरी) आणि सफिउल्ला समीर सोलकर (३२, रा. कोकणनगर, रत्नागिरी) या चार जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे.

आता हेमंत भास्कर पाटील (४७, रा. झाडगाव, रत्नागिरी), फहिम नुरमहम्मद खडकवाले (४३, रा. मच्छिमार्केट, रत्नागिरी), सलमान उर्फ आकाश अशोक डांगे (२५, रा. थिबापॅलेस, रत्नागिरी), झहीर मेहमुद काझी (४२, रा. गवळीवाडा, रत्नागिरी), सलमान लियाकत कोतवडेकर (२१, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी), दाऊद उर्फ अल्लाउद्दीन होडेकर (२९, रा. झारणीरोड, रत्नागिरी), नजफ आसिफ मिरजकर (३०, रा. गवळीवाडा, रत्नागिरी), 

दिलावर शेख (४२, रा. अबकारी चाळ गवळीवाडा, रत्नागिरी), मोहम्मद ताहिर इब्राहिम मस्तान (३१, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी), अजय अंबरनाथ कारेकर (२२, रा. उद्यमनगर,रत्नागिरी), रेहान बाबामियाँ मस्तान (३०, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी), वसीम नजीर सोलकर (२५, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) आणि जुनेद जाफर मस्तान (३२, रा. मिरकरवाडा,रत्नागिरी) यांच्या हद्दपारीची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

Web Title: Drug smugglers from Ratnagiri will be deported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.