शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात सलग चारवेळा रक्तदान करणाऱ्या दात्यांना मिळते ग्रीन कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रक्तदाते हे रक्तपेढींच्या धमन्या असतात. एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचू शकतात. म्हणूनच अशा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रक्तदाते हे रक्तपेढींच्या धमन्या असतात. एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचू शकतात. म्हणूनच अशा दात्यांच्या या कार्याबद्दलची कृतज्ञता म्हणून सलग चारवेळा जिल्हा रुग्णालयात रक्तदान करणाऱ्या दात्यांना महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषदेकडून (State Board Transfusion Council - SBTC) ग्रीन कार्ड दिले जाते. या कार्डमुळे दाता किंवा त्याच्या कुटुंबीयांना कुठल्याही शासकीय रुग्णालयात प्राधान्याने उपचारसेवा उपलब्ध होते.

अनेक शस्त्रक्रिया अथवा गंभीर आजारांमध्ये रक्ताची तातडीची गरज उद्‌भवते. प्रसूती, थॅलेसिमिया, डायलिसीस, हिमोफिलीया आदी दुर्धर आजारांसाठी, अपघातातील जखमी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हा रुग्णालयातून मोफत रक्तपुरवठा केला जातो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांना रक्ताची गरज मोठ्या प्रमाणावर लागते. त्यामुळे रक्तपेढीला सतत रक्त संकलन करावे लागते. अशावेळी वेळेवर रक्त उपलब्ध झाले नाही तर रुग्णाचा मृत्यू होतो. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी दात्यांचे योगदान महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे नियमित रक्तदान केल्याने दात्याची रक्ताभिसरण क्रियाही सुरळीत सुरू राहते. तीन महिन्यानंतर नियमित रक्तदान करणाऱ्या दात्यांचे आरोग्यही चांगले राहते.

रक्तदानाबाबत अजूनही काही लोकांमध्ये गैरसमज असल्याने रक्तदानासाठी मध्यंतरीच्या काळात अल्प प्रतिसाद होता; मात्र आता सामाजिक संस्था आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समाजात जागृतीचे काम झाल्याने व्यक्तिगत स्तरावर रक्तदान करण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचाही सहभाग वाढला आहे. त्यामुळे रक्तपेढीला रक्ताचा तुटवडा जाणवू लागताच हे दाते रक्तपेढीच्या मदतीसाठी पुढे सरसावतात.

राज्यात अशा दात्यांचे महत्त्व रुग्णाच्या दृष्टीने अनन्यसाधारण असल्याने जिल्हा रुग्णालयांमध्ये सलग चारवेळा रक्तदान करणाऱ्यांना महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषदेकडून (SBTC) ग्रीन कार्ड प्रदान करण्यात येते. हे कार्ड अशा व्यक्तींना किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना गरज भासेल त्यावेळी राज्यातील कुठल्याही शासकीय रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार मिळतात.