कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरताे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:30+5:302021-07-17T04:25:30+5:30

अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेतही रुग्णसंख्या माेठ्या प्रमाणात वाढल्याने काेकण रेल्वे मार्गावरील गाड्या ...

Does the Corona only travel by passenger train? | कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरताे का?

कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरताे का?

अरुण आडिवरेकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेतही रुग्णसंख्या माेठ्या प्रमाणात वाढल्याने काेकण रेल्वे मार्गावरील गाड्या बंद करण्यात आल्या हाेत्या. रुग्णसंख्या कमी हाेऊ लागल्यानंतर एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या. सध्या काेकण रेल्वे मार्गावर २३ एक्स्प्रेस तर ४ स्पेशल ट्रेन धावत आहेत. या गाड्या सुरू केल्या असल्या तरी पॅसेंजर मात्र अद्यापही सुरू केलेल्या नाहीत, त्यामुळे काेराेना एक्स्प्रेस गाड्यांमधून पसरत नाही, तर पॅसेंजरमधून पसरताे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काेराेनाच्या पहिल्या लाटेत सर्वच रेल्वे गाड्या बंद केल्या हाेत्या. गणेशाेत्सवाच्या काळात पाच महिन्यांनी काही गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर दुसऱ्या लाटेतही काेराेनाचे रुग्ण भरमसाठ वाढले आणि रेल्वेच्या नियमित फेऱ्या बंद केल्या. रुग्णांची संख्या कमी हाेऊ लागल्यानंतर काही गाड्या सुरू केल्या. यामध्ये २३ एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. तर गणेशाेत्सवासाठी चार स्पेशल ट्रेनच्या तब्बल ७२ फेऱ्या साेडण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्यांबराेबरच काेकण रेल्वे मार्गावर दाेन डबल डेकर साेडण्यात येणार आहेत. या गाड्यांना सुरूवातीला १२ डबे हाेते. त्याला आणखी १० डबे जाेडण्यात आले आहेत. काेराेनाच्या निर्बंधात पॅसेंजर गाड्या अजूनही अडकलेल्याच आहेत. एक्स्प्रेसचे तिकीट परवडत नसूनही केवळ पॅसेंजर बंद असल्याने प्रवास करावा लागत आहे. एक्स्प्रेस गाड्यांबराेबरच नियमांचे बंधन घालून पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी हाेत आहे.

मग पॅसेंजर बंद का?

प्रवाशांना परवडेल, त्यांना साेयीस्कर पडेल, यादृष्टीने काेकण रेल्वे मार्गावर दादर - सावंतवाडी आणि दिवा पॅसेंजर या दाेन पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आल्या हाेत्या. काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्यावर्षीपासून दाेन्ही गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने रेल्वे मार्गावरील गाड्या सुरू करण्यात येत आहेत. मात्र, यामध्ये एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश अधिक आहे. जर या गाड्या सुरू आहेत मग पॅसेंजर का सुरू नाहीत, असा प्रश्न विचारला जात आहे.

पुणे - एर्नाकुलमही सुरू

काेकण रेल्वे मार्गावरून धावणारी पुणे - एर्नाकुलम ही गाडी काेराेनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद करण्यात आली आहे. मार्गावरील गाड्या ठराविक कालावधीनंतर सुरू करण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासनाने पुणे - एर्नाकुलम एक्स्प्रेस ही गाडी सुरू केली आहे.

एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट दर जास्त असल्याने त्यातून प्रवास करणे परवडत नाही. पण, त्यातून प्रवास करताना क्राॅसिंगचा जास्त त्रास सहन करावा लागत नसल्याने एक्स्प्रेसमधून प्रवास बरा वाटताे.

- प्रथमेश भागवत,

रत्नागिरी.

पॅसेंजर गाड्यांचे तिकीट दर कमी असतात त्यामुळे त्या बऱ्या वाटतात. या गाड्या थांबत थांबत जात असल्याने प्रवास कंटाळवाणा हाेताे. एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट परवडत नसले तरी साेयीसुविधा चांगल्या असल्याने प्रवास करावासा वाटताे.

- भाग्यश्री पाध्ये, आडिवरे.

Web Title: Does the Corona only travel by passenger train?