शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणाला बाधा आणू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2015 23:47 IST

गोपाळ निगुडकर : ग्राहक हक्क परिषदेची बैठक

रत्नागिरी : वाहतुकीच्या नियमांचे कोटेकोर पालन करुन अपघात टाळावेत. तसेच विक्रेत्यांनी ग्राहकाला अवाजवी दराने वस्तूंची विक्री करु नये, ग्राहकांच्या हक्काच्या संरक्षणाला बाधा आणू नये, असे आवाहन जिल्हा स्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक झाली. यात विविध सेवा पुरवठारांशी संबंधीत शासकीय व निमशासकीय यंत्रणांकडून पुरवठा दारांकडून ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांची नियमितता, दर्जा, वाजवी दर याबाबत आढावा घेण्यात आला. प्रामुख्याने महावितरण, टेलिफोन, पुरवठा विभाग, प्रादेशिक परिवहन, अन्न व औषध प्रशासन आदी खात्यांच्या नियंत्रणाखालील सेवांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंंदे, जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते.बैठकीत सदस्यांनी जनतेला मिळणाऱ्या सेवांबाबत आपली मते मांडली. याबाबत मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी आॅटोरिक्षांनी मीटरप्रमाणे भाडे आकारणी करावी, तसेच सर्वांनी वाहतुकीचे काटेकोर पालन करुन अपघात टाळावे. नियमांचे योग्य पालन होत नसेल तर सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तसेच वाहतूक पोलिसांनी नियमांची अंमलबजावणीसाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना दिल्या. याशिवाय बाजारात दूध विक्री अवाजवी दराने होत असेल तर याबाबतही कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)