शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या करणाऱ्यांना मध्यप्रदेशात अटक

By admin | Updated: July 4, 2014 23:44 IST

रत्नागिरी, चिपळुणात चोऱ्या

रत्नागिरी : रत्नागिरी शहर, चिपळूण व जिल्ह्याच्या इतर भागात रात्रीच्यावेळी घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या मध्यप्रदेशातील गॅँगच्या दोन चोरट्यांना रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील अलीराजपूर व झार जिल्ह्यात जाऊन अटक केली आहे. मुन्शी मंगालिया भुवरिया (४५, अलिराजपूर) व कंबरसिंंग केरू मुजारदार (३८, रा. नरवाली, ता. कुकशी, जि. धार) अशी या आरोपींची नावे असून, चोरीसाठी वापरली जाणारी १४ लाखांची महिंद्रा झायलो गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. त्यांच्याकडून अनेक घरफोड्या उघड होण्याची शक्यता आहे. चोरटे हे तब्बल १२०० किलोमीटर्स एवढ्या दूरच्या अंतरावरून रत्नागिरी जिल्ह्यात येऊन घरफोड्या करीत असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे. २७ जून २०१३ रोजी घरफोडी करून जात असताना झायलो गाडी चिपळूण अलोरे पोलिसांना हूल देऊन पळून गेली होती. त्या गाडीचा अर्धवट नंबर पोलिसांना मिळाला होता. त्यावरून गुन्हा अन्वेषण शाखेने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या गाडीचा शोध घेतला. गुन्हा अन्वेषणचे पथक त्यासाठी झाबुया व अलिराजपूर जिल्ह्यात तपासासाठी गेले होते. अर्धवट नंबर मिळालेली झायलो गाडी व मालक मुन्शी भुवरिया हा बोहरी, ता. झोबर, जिल्हा-अलिराजपूर येथे असल्याची माहिती मिळताच त्याच्या घरी छापा टाकून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व नंतर कंबरसिंग केरूला ताब्यात घेण्यात आले. हे लोक भिल्ल समाजाचे असून दुर्गम भागात राहतात. पोलीस पकडायला गेल्यावर त्यांच्यावर तिरकामट्याने हल्ला करतात. अशा स्थितीतही स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाई करणाऱ्या या पथकात गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील, जमीर पटेल, तानाजी मोरे, किरण भाटकर, संजय शिंगे, शांताराम पंदेरे, प्रवीण बर्गे, वैभव मोरे, सागर साळवी, विक्रम पाटील, पांडुरंग जवरत, अमोल गमरे, रमीज शेख यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)